AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार, उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांची घेणार भेट

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे पर्यावरण तज्ज्ञ आणि संशोधक सोनम वांगचुक यांची उद्या दिल्ली येथे जंतरमंतर येथे जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. सोनम वांगचुक यांना सोशल मीडियातून प्रचंड समर्थन मिळत आहे.

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला जाणार, उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांची घेणार भेट
MNS leader Amit Thackeray will meet Wangchuk in Delhi tomorrow
| Updated on: Jul 17, 2026 | 4:14 PM
Share

पर्यावरण तज्ज्ञ आणि ज्येष्ठ संशोधक सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत. सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात उपोषण सुरु असून त्यांना समाजातील अनेक स्तरातून पाठींबा सुरु आहे. वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावे अशी मागणी अनेक नेत्यांनी केली आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे. राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली होती. आता मनसेचे युवा नेते अमित ठाकरे उद्या सकाळी दिल्लीला जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत.

सोनम वांगचुक यांचे दिल्लीच्या जंतरमंतर येथे गेल्या २० दिवसांपासून उपोषण सुरु आहे.  त्यांच्या सोबत क्रॉकोच जनता पार्टीचे अभिजित दीपके देखील उपस्थित आहेत.  उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची तब्येत ढासळत चालली असून त्यांचे वजन देखील ८ ते ९ किलोने कमी झाले आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात असून  केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.

सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला समाजमाध्यमातून खूप प्रसिद्धी मिळत आहे. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी बुधवारी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत त्यांची भेट न घेणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेचा माज आल्याची टीका केली होती. मनसेचे नेते अमित ठाकरे उद्या दिल्लीला सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहे. त्यावेळी मनसेचे इतरही काही नेते उपस्थित असणार आहेत.  काल वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील सोनम वांगचुक यांची भेट घेतली होती.

हे सरकार असंवेदनशील आहे – सुप्रिया सुळे यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली जंतरमंतर येथे जाऊन आज उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांची भेट घेत त्यांच्या तब्येची विचारपूस केली. सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका करत हे सरकार असंवेदनशील आहे. या सरकारचा एकही प्रतिनिधी गेले २० दिवस सोनम वांगचुक यांची भेट घेण्यास आलेला नाही अशी टीका सुळे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार