AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बचाव कार्यात अडथळ, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना दिले गेले मोबाईल आणि बोर्ड गेम

बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आज कामगार बाहेर येतील अशी अपेक्षा होती. पण मशीन खराब झाल्याने पुन्हा एकदा कामात अडथळा आलाय. कामगारांना ताण कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. ऑगर मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे बचाव कार्यात विलंब होऊ शकतो.

बचाव कार्यात अडथळ, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना दिले गेले मोबाईल आणि बोर्ड गेम
Updated on: Nov 25, 2023 | 10:48 PM
Share

Uttarkashi Tunnel Rescue : सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पण यादरम्यान अनेक अडथळे येत आहेत. आज कामगारांना बोगद्यातून बाहेर काढले जाईल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. बचाव मोहीम अजून ही सुरुच आहे. ऑगर मशीन बिघडल्याने मशिन बनवण्याचा प्रयत्न झाला पण तो दुरुस्त होऊ शकला नाही.

मोबाईल फोन आणि बोर्ड गेम्स

बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांचा ताण कमी करण्यासाठी त्यांना मोबाईल फोन आणि बोर्ड गेम्स देण्यात आले आहेत. रेस्क्यू ऑपरेशनशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, सिल्क्यरा येथील बुडलेल्या बोगद्याचे ‘ड्रिल’ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ऑगर मशीनचे ब्लेड ढिगाऱ्यात अडकल्याने काम थांबवण्यात आले. यानंतर, इतर पर्यायांचा विचार केला जात आहे ज्याच्या मदतीने कामगारांना लवकरात लवकर बोगद्यातून बाहेर काढता येईल.

कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कामगारांना व्हिडिओ गेम खेळता यावे म्हणून मोबाईल फोन देण्यात आले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कामगारांना लुडो आणि साप -शिडीसारखे बोर्ड गेम देण्यात आले आहेत. या खेळामुळे त्यांचा ताण कमी होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ऑगर मशीनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे कामाला विलंब होऊ शकतो.

कामगार १३ दिवसांपासून अडकून पडले

उत्तरकाशी येथे ही भीषण दुर्घटना घडली असून बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ४१ कामगार गेल्या १३ दिवसांपासून त्यात अडकले आहेत. उत्तरकाशीचा हा बोगदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी चार धाम प्रकल्पाचा एक भाग आहे.

मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.