पंजाब-हरियाणा सह 6 राज्यात मॉक ड्रील, ब्लॅकआऊटने पाकिस्तानात हडकंप
'ऑपरेशन शील्ड' अंतर्गत सहा सीमेवरील राज्यात भारतीय सैन्याने शनिवारी मॉक ड्रील केली. या राज्यात नागरी संरक्षणासाठी आपात्कालिन स्थितीची रंगीत तालीमच घेण्यात आली.त्यासाठी सायरन वाजवणे, प्रथमोपचार,अग्निशमन, हवाई मदत, वैद्यकीय मदत याचे प्रात्यक्षिक घेण्यात आली.

पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी पहलगाम येथे २६ पर्यटकांना ठार केल्यानंतर दोन्ही देशात संबंध बिघडले होते. त्यानंतर भारताने देशव्यापी मॉक ड्रील केली होती आणि त्याच रात्री भारतीय वायूदलाने पाकच्या नऊ अतिरेकी तळांवर हवाई हल्ला केला. त्यानंतर भारताने सहा सीमावर्ती राज्यात आज शनिवारी पुन्हा मॉक ड्रील केली. या मॉक ड्रीलने परत पाकिस्तानच्या हृदयात धडकी भरली आहे.
सीमेवरील जम्मू-कश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि केंद्र शासित प्रदेश चंडीगड या सहा राज्यात शनिवारी मॉक ड्रील झाली. भारत-पाक तणावाचा काळ चालू आहे. जर अशावेळी हवाई हल्ला झाल्यास घ्यावयाची दक्षता आणि वैद्यकीय मदतीच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण शनिवारी झाले. यावेळी सर्व आपात्कालीन यंत्रणेचा प्रतिसाद किती मिनिटात येतो याची रंगीत तालीम करण्यात आली. या मॉकड्रीलचे आयोजन खरे तर २९ मे रोजी होणार होते. परंतू काही प्रशासकीय कारणांनी ती आज शनिवार दि.३१ मे रोजी घेण्यात आले.
येथे पोस्ट पाहा –
#WATCH पंजाब: अमृतसर में ‘ऑपरेशन शील्ड’ के तहत मॉक ड्रिल का आयोजन किया जा रहा है। pic.twitter.com/v0CtRD17gg
— ANI_HindiNews (@AHindinews) May 31, 2025
पाकिस्तानला भरली धडकी
२२ मे रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मिरातील पहलगाम येथे पर्यटकांवर अंधाधुंद फायरिंग करीत २६ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर भारताने आधी डिप्लोमॅटीक स्तरावरील सिंधू जल वाटप करार, आणि व्हीसा रद्द करणे, नागरिकांना त्यांच्या देशात पाठवणूक करणे, दुतावास बंद करणे आदी पावले उचलली होती. त्यानंतर ६ मे रोजी भारताने देशव्यापी मॉकड्रीलचे आयोजन केले होते. मात्र त्याच रात्री भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाब प्रांता हवाई हल्ले केले होते. त्यामुळे या मॉक ड्रीलनंतर भारत पुन्हा हवाई हल्ले करतो की काय या विचारानेच पाकिस्तानला धडकी भरली होती.
जम्मू – काश्मीरात ब्लॅकआऊट
७ मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन दहशतवाद चिरडल्यानंतर हा देश भारतावर डुख ठेवून आहे. त्यामुळे भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी आपली तयारी मजबूत करण्यासाठी भारतीय सैन्याने सहा सीमेवरील राज्यात मॉक ड्रीक केली. या मोहिमेस ‘ऑपरेशन शील्ड’ असे नाव देण्यात आले आहे. या ‘ऑपरेशन शील्ड’ अंतर्गत, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि जम्मू आणि काश्मीर या ६ सीमावर्ती राज्यांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजित केले गेले. शनिवारी सायं. ५ ते रा. ९ वाजेपर्यंत ही मॉकड्रील करण्यात आली. काही राज्यांमध्ये ब्लॅक आऊट देखील करण्यात आले.
जम्मू – काश्मीरात ब्लॅकआऊट घेण्यात आले, पोस्ट पाहा –
#WATCH | Jammu | Regarding the mock drill, ADC Jammu, Ansuya Jamwal, says, “As soon as the siren was heard, there was a blackout. A demonstration was carried out that a building was on fire because of an air raid. A drill was carried out to extinguish the fire, the response of… https://t.co/dkb0GjFGp5 pic.twitter.com/nj0GfOnz38
— ANI (@ANI) May 31, 2025
