AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; ‘या’ 12 जातींचा एसटी प्रवर्गात समावेश

छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील अनेक आदिवासी समुदायांना अनुसूचित जमातीच्या श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; 'या' 12 जातींचा एसटी प्रवर्गात समावेश
Image Credit source: TV9 Marathi
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Sep 14, 2022 | 10:54 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) प्रवर्गाबद्दल बुधवारी मोठा निर्णय घेतला. पाच राज्यांतील एकूण 12 जातींचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. देशात नजीकच्या काळात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Elections) होणार आहेत. त्याचदरम्यान केंद्राने हा मोठा निर्णय घेऊन विविध जातींना दिलासा दिला.

अनेक आदिवासी समुदायांना दिलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधील अनेक आदिवासी समुदायांना अनुसूचित जमातीच्या श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना या निर्णयाची माहिती दिली.

विविध राज्यांतून जोर धरत होती मागणी

सिरमौर जिल्ह्यातील ट्रान्स-गिरी भागातील हत्ती समाजाचे लोक त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून करीत होते.

तसेच उत्तराखंडच्या जौनसार भागातील अशाच लोकांना देखील अनुसूचित जातीचा दर्जा देण्याची मागणी होत होती. या सर्व पार्श्वभूमीवर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

बिझिया समाजाला ओडिसा आणि झारखंडमध्ये अनुसूचित जमातीच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत केल्यानंतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आली व त्याला मंजुरी दिली आहे.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत दिले होते आश्वासन

केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत याबाबत जनतेला आश्वासन दिले होते. गोंड जातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यासाठी कायदा आणण्याचे आश्वासन त्यावेळी भाजपकडून देण्यात आले होते.

त्या अनुषंगाने मोदी सरकारने संबंधित कार्यवाहीला गती दिली आणि अखेर पाच राज्यांतील 12 जातींचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यात आला आहे.

पाच राज्ये स्वतंत्र विधेयके आणणार

पाच राज्यांतील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये सुधारणा करण्यासाठी तेथील सरकारे आता स्वतंत्र विधेयके आणणार आहे. विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर नव्याने समाविष्ट केलेले समुदाय एसटीसाठी सध्या लागू असलेल्या सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकणार आहेत.

अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळणार

अनुसूचित जमातीसाठी सध्या असलेल्या प्रमुख योजनांमध्ये शिष्यवृत्ती, राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती, राष्ट्रीय फेलोशिप, उच्च श्रेणीचे शिक्षण, राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळाकडून सवलतीचे कर्ज, या समुदायातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे यांचा समावेश आहे.

Follow Us
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...