AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big News: मेडिकल अभ्यासक्रमात OBC आणि EWS आरक्षण लागू, मोदी सरकारचं मोठं पाऊल

केंद्र सरकारनं ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. reservation for obc and ews

Big News: मेडिकल अभ्यासक्रमात OBC आणि EWS आरक्षण लागू, मोदी सरकारचं मोठं पाऊल
मेडिकल अभ्यासक्रमात ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jul 29, 2021 | 4:18 PM
Share

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 27 टक्के तर इडब्ल्यूएसच्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. हा निर्णय देशपातळीवर लागू असणार आहेय. 2021-22 पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

2021-22 पासून निर्णय लागू

मोदी सरकारनं ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केलीय. मेडिकलच्या कोर्समध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षणाची घोषणा सरकारच्यावतीनं करण्यात आलीय. 2021-22 वर्षासाठी हे आरक्षण लागू असेल. ओबीसी(OBC)तसच ईडब्लूएस (EWS)अशा दोन्ही वर्गांना ह्या आरक्षणाचा लाभ होईल. यात अंडरग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल/डेंटल कोर्स (MBBS/MD/MS/Diploma/ BDS/MDS)मध्ये ओबीसींना 27 टक्के तर EWS च्या विद्यार्थ्यांना 10 टक्के रिजर्वेशनचा फायदा मिळेल. ह्या आरक्षणाचा फायदा ऑल इंडिया कोटा स्कीम(AIQ)च्या माध्यमातून मिळेल.

एका रिपोर्टनुसार-जवळपास 5 हजार 550 विद्यार्थ्यांना मोदी सरकारच्या ह्या निर्णयाचा फायदा होईल. दरवर्षी MBBS च्या दीड हजार OBC विद्यार्थ्यांना तर पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्या 2500 ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल. तर EWS च्या आरक्षणाचा लाभ एमबीबीएसमध्ये 550 तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 1000 विद्यार्थ्यांना आरक्षण मिळेल. विशेष म्हणजे सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एकूण जागांच्या 15 टक्के जागा ह्या UG म्हणजे अँडरग्रॅज्युएट तर पोस्ट ग्रॅज्युएटच्या 50 टक्के सीटस् ह्या ऑल इंडिया कोट्यात येतात.

देशभरातील ओबीसींचा असंतोष कमी होईल?

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का बसल्यानंतर देशभरात ओबीसींमध्ये असंतोष आहे. त्यातच उच्च शिक्षणातल्या आरक्षणात मोदी सरकारनं निर्णय घ्यावा म्हणून दबाव निर्माण झाला होता. त्यातच यूपीसारख्या राज्यात निवडणुका होऊ घातल्यात. त्यापार्श्वभूमीवर दोनच दिवसांपुर्वी मोदींनी संबंधित मंत्र्यांना हा प्रश्न सोडवण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्यानंतर आता हा निर्णय झालाय.

विशेष म्हणजे एनडीएचच्याच ओबीसी खासदारांचं एक शिष्टमंडळानेच बुधवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. ऑल इंडिया मेडिकल कोट्यात ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास(EWS)यांना आरक्षण लागू करावं अशी मागणी केली होती. त्यानंतरच हा महत्वाचा निर्णय झालाय.

 इतर बातम्या:

NEET मध्ये OBC आरक्षण सुनिश्चित करा, विविध संघटनांची आग्रही मागणी

NEP: नव्या शैक्षणिक धोरणाची वर्षपूर्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षणमंत्री कार्यक्रमाला संबोधित करणार

Modi Government take big decision reservation for obc and ews allowed in UG and PG Medical Courses

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...