NEET मध्ये OBC आरक्षण सुनिश्चित करा, विविध संघटनांची आग्रही मागणी

संघटनांनी 'सोशल रेव्होल्यूशन अलायन्स' (एसआरए) च्या बॅनरखाली आयोजित पत्रकार परिषदेत NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये ओबीसींसाठी आरक्षण निश्चित केले जावे, अशी आग्रही मागणी केली आहे.

NEET मध्ये OBC आरक्षण सुनिश्चित करा, विविध संघटनांची आग्रही मागणी
नीट
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Jul 27, 2021 | 8:23 PM

नवी दिल्ली : मागासवर्गीय, अनुसूचित जाती व जमातींच्या विविध संघटनांनी केंद्र सरकारला यावेळी जनगणनेत जाती आधारित आकडेवारी गोळा करण्याचे आवाहन केले जेणेकरुन वंचित पीडित समाजाला आरक्षणाचा योग्य लाभ मिळावा. याच व्यक्ती आणि संघटनांनी ‘सोशल रेव्होल्यूशन अलायन्स’ (एसआरए) च्या बॅनरखाली आयोजित पत्रकार परिषदेत NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये ओबीसींसाठी आरक्षण निश्चित केले जावे, अशी आग्रही मागणी केली आहे.

आंध्र प्रदेश हायकोर्टाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश व्ही. ईश्वरीया, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश वीरेंदरसिंग यादव, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक अवधेश कुमार साह, ‘मतदाता शिक्षण फाऊंडेशन’ या संघटनेचे पदाधिकारी अशोक कुमार सिंह, ओबीसी महासभा (मध्य प्रदेश) अध्यक्ष धर्मेंद्र कुशवाह आणि इतर काही महत्त्वाच्या व्यक्ती एसआरएच्या बॅनरखाली एकत्र आल्या होत्या.

“यावर्षीच्या जनगणनेत जाती आधारित जनगणनेचा समावेश करावा. जर तसे केले नाही तर मागासवर्गीय समाज मोठं आंदोलन छेडेल, असा इशारा एसआरएकडून देण्यात आलाय. ओबीसी वर्गांच्या कल्याणासाठी केंद्रीय स्तरावर ‘एनईईटी’ परीक्षेत ओबीसी आरक्षण निश्चित केले जावे. तसंच स्वतंत्र मंत्रालय तयार केले पाहिजे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग बनवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

NEET 2021 च्या परीक्षेत हा मोठा बदल

शिक्षण मंडळांकडून शालेय अभ्यासक्रमातील असणाऱ्या उणीवांना तर्कसंगत बनविण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) NEET 2021 च्या पेपरमध्ये अंतर्गत निवड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. NEET परीक्षेत यावेळी हा मोठा बदल आहे. आज जाहीर केलेल्या प्रश्न पॅटर्ननुसार NEET 2021 मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या तीन विषयांचा समावेश आहे. ए आणि बी असे दोन विभाग असतील. पहिल्या विभागात अनिवार्य प्रश्न असतील तर दुसर्‍या विभागात 15 प्रश्न असतील… त्यातील कोणत्याही 10 प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावी लागतील.

“प्रत्येक विषयात दोन विभाग असतील. सेक्शन ए 35 प्रश्न असतील आणि सेक्शन बी मध्ये 15 प्रश्न असतील, या 15 प्रश्नांमधल्या उमेदवाराला कोणत्याही १० प्रश्नांची उत्तरे उमेदवाराला द्यावी लागतील. एकूण प्रश्नांची संख्या आणि वेळ वापर समान राहील. यंदाच्या जेईई मेन परीक्षेसाठी सुरू केलेल्या परीक्षे घेण्याचा परीक्षा पॅटर्न आहे.

(OBC reservation Should be Ensured in NEET Demand SRA)

हे ही वाचा :

NTPC Recruitment 2021: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

ओबीसींचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपली भूमिका सातत्याने मांडवी लागणार : हरी नरके

Kargil Vijay Diwas Special: कारगील युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलं, शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जीवन प्रवास माहिती आहे का?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें