Mohali Blast: हल्लेखोर स्विफ्ट कारमधून आले आणि ग्रेनेडचा मारा केला; मोहाली ब्लास्टचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती

Mohali Blast: मोहाली ब्लास्टचं सीसीटीव्ही फूटेज हाती आल्यानंतर पंजाब पोलिसांनी या स्विफ्ट कारचा शोध सुरू केला आहे.

Mohali Blast: हल्लेखोर स्विफ्ट कारमधून आले आणि ग्रेनेडचा मारा केला; मोहाली ब्लास्टचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 2:38 PM

मोहाली: पंजाबच्या (Punjab) मोहाली येथील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर ग्रेनेड हल्ला (Mohali Blast) करण्यात आला होता. यावेळी आरोपींनी गुप्तचर विभागाच्या कार्यालयावर ग्रेनेड फेकले. त्यामुळे या इमारतीचं नुकसान झालं आहे. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी (Punjab Police) फरीदकोटमध्ये राहणाऱ्या निशान सिंह नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने हल्लेखोरांना लॉजिस्टिक प्रोव्हाईड केले होते, अशी माहिती मिळत आहे. या शिवाय पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फूटेज लागले आहे. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये हल्लोखर पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये दिसत आहेत. पोलीस या हल्लेखोरांची ओळख पटवण्याचं काम करत असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. राज्यात येणाऱ्या आणि राज्यातून जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच संशयितांचीही कसून चौकशी केली जात आहे. शहरातील मुख्य प्रवेशद्वारांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून काही ठिकाणी पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.

मोहाली ब्लास्टचं सीसीटीव्ही फूटेज हाती आल्यानंतर पंजाब पोलिसांनी या स्विफ्ट कारचा शोध सुरू केला आहे. मोहाली येथील गुप्तचर विभागाच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी या स्विफ्ट कारचा वापर करण्यात आला होता. एका पोलीस अधिकाऱ्याने ही कार ओळखली आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मी पिज्जाची ऑर्डर घ्यायला गेलो. तेव्हा ही कार बिल्डिंगच्या समोर पार्क करण्यात आलेली होती. मी आत येताच रॉकेटद्वारे इमारतीवर हल्ला केला गेला. पिज्जा डिलिव्हरी बॉयनेही ही कार पाहिली आहे.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्ही फूटेजमध्ये काय?

या सीसीटीव्ही फूटेजमध्ये गुप्तचर कार्यालयाच्या आवारात तीन कार दिसत आहेत. पांढरी स्विफ्ट कार ही दोन कारपासून अंतरावर आहे. गेटमधून पटकन जाता येईल अशा पद्धतीने कार उभी आहे. तसेच कारमध्ये कोणी तरी बसल्याचे दिसून येत आहे. गेट खुला असून बाजूला तुरळक वाहनांची ये जा सुरू आहे. अवघ्या 39 सेकंदाच्या या व्हिडीओत कार स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, ग्रेनेड डागतानाचं फूटेज यात आलेलं नाही.

एकाला अटक

सोमवारी मोहाली येथील गुप्तचर विभागाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड आरपीजीहून सेक्टर 77मध्ये असलेल्या या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तरन तारन येथे राहणाऱ्या निशान सिंग याला अटक केली आहे. या प्रकरणातील ही पहिली अटक आहे.

तालिबानचं कनेक्शन

मोहालीमध्ये हल्ला करण्यासाठी जे रॉकेट लॉन्चर आरपीजीचा वापर झाला ते रॉकेट अफगाणिस्तानातून तालिबानने पाठवलं होतं. रशियात हे रॉकेट तयार झालं असून निशान सिंगला ते मिळालं होतं. त्यामुळे या हल्ल्याचं तालिबान कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या निशान सिंगची चौकशी करत आहे. निशान सिंगने आरोपींनी लॉजिस्टिक प्रोव्हाईड केल्याचा आरोप आहे. निशान सिंगची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत असून या षडयंत्राचा लवकरच सोक्षमोक्ष लावला जाणार आहे.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.