AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cloudbursts in Amarnath:काही मिनिटांत 300 कोटी लिटरहून अधिक पाऊस, खरंच ढगफुटी होते का, अमरनाथ-केदारनाथ परिसरात नेहमी असं का घडतं?

जम्मू काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन झालेल्या दुर्घटनेत 16 भाविकांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ढगफुटी म्हणजे नक्की काय? त्यामागे नक्की काय कारण आहे, हे जाणून घेऊया.

Cloudbursts in Amarnath:काही मिनिटांत 300 कोटी लिटरहून अधिक पाऊस, खरंच ढगफुटी होते का, अमरनाथ-केदारनाथ परिसरात नेहमी असं का घडतं?
का होते ढगफुटी?Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 6:20 PM
Share

अमरनाथ –  जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ (Amarnath Cloudburst) गुहेजवळ शुक्रवारी ढगफुटी सदृश पाऊस होऊन झालेल्या दुर्घटनेत 16 हून अधिक जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर 50 हून अधिक जण जखमी ( Injured) झाले आहेत. तसेच काही भाविक अद्यापही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेनंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. यापूर्वी हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे ढगफुटी झाली होती. उत्तराखंड येथे ढगफुटीच्या घटना नेहमी होत असतात. पर्वतीय राज्यांमध्ये ढगफुटीचा धोका नेहमी असतो. तेथील नागरिकांचा जीवही सदैव धोक्यात असतो. पण ही ढगफुटी म्हणजे काय? नेमके काय होते, ढगफुटीच्या या घटना नेहमी का घडतात ? हे जाणून घेऊया.

ढग का फुटतात ?

जेव्हा एखाद्या भागात प्रमाणापेक्षा अधिक मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा त्या घटनेला ‘ढगफुटी’ असे म्हणतात. सामान्य परिस्थितीत एखाद्या छोट्या भागांत एका तासात 10 सेंटीमीटरहून अधिक पाऊस झाल्यास, त्याला ढगफुटी असे म्हटले जाते. मुसळधार पावसामुळे तेथे पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. डोंगराळ भागांत अशा घटना जीवघेण्या ठरू शकतात. कधीकधी अवघ्या काही मिनिटांत मुसळधार पाऊस पडतो. मात्र तो कधीही, अचानक होऊ शकतो. अशा भागांमध्ये ढगफुटी कधी होईल, याचा काही नेम नसतो. मैदानी भागांत मात्र ढगफुटीची घटना असामान्य आहे आणि तेथे त्याचा मोठा परिणाम होत नाही. जेव्हा काळेकुट्ट ढग भरून येतात आणि एका जागी स्थिर होतात, व त्यामधील पाण्याचे थेंब एकमेकांमध्ये मिसळून जातात, तेव्हा अचानक मुसळधार पावसाला सुरूवात होते. पाण्याच्या थेंबामुळे त्यांचा भार वाढतो व ढगांचे घनत्वही वाढते. त्यामुळे जिथे ढगफुटी होते, तिथे पावसाचा जोर खूप जास्त असतो.

कोणत्या परिस्थितीत होऊ शकते ढगफुटी ?

मैदानी भागात ढगफुटी होणे असामान्य आहे. डोंगराळ भागात ढगफुटी झाल्यास दुर्घटना होऊ शकते, पण मैदानी भागांत तो धोका नाही. डोंगराळ भागांची रचनाही पुराला कारणीभूत ठरते. गरम हवा ढगांच्या दिशेने वळल्यास ढगफुटी होऊ शकते. मैदानी भागांतही ढगफुटी होऊ शकते.

ढगफुटीचा सर्वाधिक धोका कधी असतो ?

भारताचे सर्वात दक्षिणेकडील राज्य असलेल्या केरळमध्ये मान्सून साधारण 01 जूनपर्यंत पोहोचतो. समुद्रातून येणारे मान्सूनचे वारे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हिमालयात पोहोचतात. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान मान्सून सर्वाधिक सक्रीय असतो. त्यामुळेच हिमालय असो वा मैदानी भाग, याच काळात सर्वात अधिक ढगफुटी होते. तापमानातील बदलांमुळेही ढगफुटीच्या घटना वाढत असून त्यांच्या तीव्रतेमध्येही वाढ होत आहे. ढगफुटीच्या वाढत्या घटनांमुळे अचानक पूर येणे, डोंगर खचणे वा दरड कोसळणे, भूस्खलन होणे अशा घटनाही वाढत आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.