
IAS अवि प्रसाद यांनी तिसरं लग्न केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. अवी प्रसाद यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, मध्य प्रदेशातील प्रशासकीय सेवेत ते सक्रिय आहेत. ते कायम त्यांच्या सक्त कारवायांमुळे चर्चेत असते. पण आता अवी प्रसाद त्यांच्या कारवायांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. अवी प्रसाद यांनी तिसरं लग्न केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांच्या पहिल्या दोन पत्नी देखील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत आणि सध्या त्या जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून काम करतात. त्यांची तिसरी पत्नी राज्य मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी आहे.
अवि प्रसाद यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांची प्रशासकीय कारकीर्द सुरुवातीपासूनच उल्लेखनीय राहिली आहे. 2013 मध्ये त्यांची भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) निवड झाली. पण त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि 2014 च्या यूपीएससी परीक्षेत 13 वा क्रमांक मिळवला आणि भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) स्थान मिळवलं. या यशामुळे अवि प्रसाद त्यांच्या बॅचमधील सर्वात हुशार अधिकाऱ्यांमध्ये सामील झाले.
अवि प्रसाद यांना लहानपणापासूनच राजकारण आणि सार्वजनिक जीवनात वाढले. त्यांचे आजोबा, तांबेश्वर प्रसाद, ज्यांना बच्चा बाबू म्हणूनही ओळखलं जातं, त्यांनी चौधरी चरण सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलं. त्यांच्या जवळच्या लोकांच्या मते, यामुळे त्यांना प्रशासन आणि प्रशासनाची समज मिळाली.
दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अवि प्रसाद यांची ओळख रिझू बाफना यांच्यासोबत झाली. अखेर ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. रिझू बाफना सध्या मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत आणि राज्यात एक सक्षम आणि कडक प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. पण रिझू आणि अवि यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यामुळे दोघांनी परस्पर सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला.
पहिला घटस्फोट झाल्यानंतर अवि प्रसाद यांनी आंध्र प्रदेश 2016 बॅचच्या आईएएस अधिकारी मिशा सिंह यांच्यासोबत लग्न केलं . लग्नानंतर, मीशा सिंह मध्य प्रदेश केडरमध्ये सामील झाल्या. त्या सध्या रतलामच्या जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी 2025 मध्ये जिल्ह्याचा पदभार स्वीकारला होता. रतलाममधील त्यांचा कार्यकाळ त्यांच्या सक्रिय प्रशासकीय शैलीसाठी ओळखला जातो. पण अवि प्रसाद यांच्यासोबत असलेलं त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 4 वर्षांनंतर अवि आणि मिशा यांचा घटस्फोट झाला.
अवि प्रसाद यांनी तिसरं लग्न 2017 बॅचच्या आयएएस अधिकार अंकिता धाकरे यांच्यासोबत लग्न केलं… अंकिता धाकरे राज्य मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी आहे. 11 फेब्रुवारी रोजी अवि प्रसाद आणि अंकिता धाकरे यांचं लग्न झालं. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.