AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राहुल गांधी नरेंद्र मोदींच्या भेटीला, दिल्लीत मोठ्या घडामोडी

Rahul Gandhi : खासदार राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत.

मोठी बातमी! राहुल गांधी नरेंद्र मोदींच्या भेटीला, दिल्लीत मोठ्या घडामोडी
rahul gandhi and narendra modi
| Updated on: May 05, 2025 | 6:58 PM
Share

Rahul Gandhi : पहलगाम हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिन्ही सेनादलाचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, केंद्रीय मंत्री यांच्यासोबत बैठका घेत आहेत. तर दुसरीकडे देशाच्या सीमेवरही सैन्य सज्ज झाले आहे. असे असतानाच आता खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयात मोदी आणि राहुल गांधी यांच्यात भेट होणार आहे.

राहुल गांधींच्या भेटीचे कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात भेट होणार आहे. राहुल गांधी पंतप्रधान कार्यालयात पोहोचले आहेत. या भेटीत केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयच्या संचालकपदाच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा होणार आहे. तत्पुर्वी नरेंद्र मोदी यांनी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी एक बैठक घेतली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात भेट होणार आहे.

मोदींचा बैठकांचा धडाका

आज सकाळपासून नरेंद्र मोदी यांचा बैठकांचा धडाका चालू आहे. सकाळी त्यांनी सकाळी संरक्षण सचिवांशी एक बैठक घेतली. संध्याकाळ सरता सरता आता मोदी आणि राहुल गांधी यांच्यात बैठक होत आहे. या भेटीमध्ये अन्य कोण-कोणत्या विषयांवर चर्चा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सीबीआयच्या संचालकांची नुयक्ती कशी होते?

सीबीआयच्या संचालकांची नियुक्ती ही त्रिस्तरीय सदस्यांमार्फत होते. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतात. सोबतच या समितीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतात. यासह देशाचे सरन्यायाधीशही या समितीत असतात. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन अॅक्ट 2003 नुसार सीबीआयच्या संचालकांची नियुक्ती केली जाते. सीबीआय संचालकांचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असतो.

पहलगाम हल्ल्याविषयी चर्चा होणार का?

राहुल गांधी आणि मोदी यांच्या भेटीची सध्या देशभरात चर्चा होत आहे. देशात पहलगामचा हल्ला ताजा आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या मोदी आणि राहुल गांधी यांच्या बैठकीत पहलगामविषयी चर्चा होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही बैठक सीबीआय संचालकांच्या निवडीसाठी असली तरी पहलगामवर काही चर्चा होणार का? चर्चा झालीच तर ती काय असेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?