
गेल्या काही दिवसांपासून देशाचे लक्ष पश्चिम बंगालमधील कोलकाताकडे आहे. कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरावर अत्याचार करुन निघृण हत्या करण्यात आली. या प्रकाराने देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. देशभरात डॉक्टर अन् परिचारिकांचा संप सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल केली आहे. केंद्रीय अन्वेषन विभागाकडून (सीबीआय) या घटनेचा तपास सुरु झाला आहे. या घटनेतील आरोपी कोणी बाहेरचा व्यक्ती नाही तर रुग्णालयातील सिविक वॉलंटियर (पोलिसांना मदत करण्यासाठी असणारा) आहे. संजय रॉय असे त्या आरोपीचे नाव आहे. 2019 पासून तो रुग्णालयात कार्यरत आहे. त्यानेच प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर गळा आवळून हत्या केली. पीडितेचा मृतदेह मिळाला तेव्हा तिच्या डोळे आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता. चेहऱ्यावर, नखांवर, पोटावर, डाव्या पायावर, मानेवर, उजव्या हातावर, ओठांवर जखमेच्या खुणा होत्या. याच पद्धतीची घटना मुंबईत 50 वर्षांपूर्वी घडली होती. काय घडले होते मुंबईत 27 नोव्हेंबर 1973 म्हणजेच...