AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tahawwur Rana: एनआयएकडून तहव्वूर राणा याने मागितल्या तीन वस्तू, अधिकाऱ्यांनी त्याला काय, काय दिले?

Tahawwur Rana: राणा याला त्याच्या वकिलाला भेटण्याची परवानगी आहे. तसेच दर ४८ तासांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. अमेरिकेतून राणाचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याला १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत दिली आहे. राणा गुरुवारी संध्याकाळी अमेरिकेहून भारतात आला.

Tahawwur Rana: एनआयएकडून तहव्वूर राणा याने मागितल्या तीन वस्तू, अधिकाऱ्यांनी त्याला काय, काय दिले?
तहव्वूर राणाImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 13, 2025 | 8:04 AM
Share

Tahawwur Rana: मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा सध्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत आहे. एनआयए अधिकारी त्याची सतत कसून चौकशी करत आहे. शनिवारी दुसऱ्या दिवशी त्याची चौकशी झाली. या दरम्यान राणा याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. एनआयए कोठडीत असलेल्या राणाने तीन वस्तूंची मागणी अधिकाऱ्यांकडे केली.

राणा याने काय काय मागितले

अधिकाऱ्याने सांगितले की त्याला कोणतीही विशेष वागणूक दिली जात नाही. अटक केलेल्या व्यक्तीला जशी वागणूक दिली जाते तशीच वागणूक त्याला दिली जात असल्याचे त्याने सांगितले. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याने कोठडीत तीन गोष्टींची मागणी केली. त्याने कुराण, पेन आणि कागदाची मागणी केली आहे. त्याच्या मागणीनंतर त्याला कुराणची प्रत देण्यात आली आहे. तो एजन्सी मुख्यालयात दररोज पाच वेळा नमाज अदा करत आहे. कुराण व्यतिरिक्त राणा याने पेन आणि कागदाची मागणी केली होती. ते ही त्याला देण्यात आले आहे. परंतु पेनच्या मदतीने त्याने स्वतःला इजा पोहोचवू नये म्हणून त्याच्यावर कडक देखरेख ठेवली जात आहे.

दर ४८ तासांनी त्यांची वैद्यकीय तपासणी

राणा याला त्याच्या वकिलाला भेटण्याची परवानगी आहे. तसेच दर ४८ तासांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. अमेरिकेतून राणाचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याला १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत दिली आहे. राणा गुरुवारी संध्याकाळी अमेरिकेहून भारतात आला. त्याला यूएपीए अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

शुक्रवारी सकाळी त्याला एनआयए मुख्यालयात आणण्यात आले. तेव्हापासून तपास यंत्रणा त्याची सतत चौकशी करत आहे. चौकशीत तो सहकार्य करत नाही. अनेक गोष्टींना तो आठवत नाही, अशी उत्तरे देत आहे. त्याला त्याच्या परिवारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. परंतु त्याची उत्तरे देणे तो टाळत होता.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा