AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26 वर्षाचा तरुण, 46 वर्षाची महिला आणि 9 दिवस… हॉटेलमध्ये सापडले…; मॅनेजर काय म्हणाला?

उत्तर प्रदेशच्या बहराइच येथील एका हॉटेलमध्ये 26 वर्षीय तरुण आणि 46 वर्षीय महिलेचे मृतदेह पंख्याला लटकलेले आढळले. नऊ दिवसांपासून ते हॉटेलमध्ये थांबले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, त्यांच्या मृत्यूमागचे कारण आणि संबंध यावर अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

26 वर्षाचा तरुण, 46 वर्षाची महिला आणि 9 दिवस... हॉटेलमध्ये सापडले...; मॅनेजर काय म्हणाला?
crime newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 3:07 PM
Share

उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये एका हॉटेलच्या रुममध्ये एक तरुण आणि महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोघेही गेल्या नऊ दिवसांपासून या हॉटेलमध्ये थांबले होते. गुरुवारी बराच वेळ रुममधून कोणीच बाहेर न आल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी दोघेही पंख्याला लटकलेले आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बहराइचच्या हॉटेल अवध कैलाशमधील ही घटना आहे. 22 सप्टेंबरपासून रिंकू हा 26 वर्षाचा तरुण आणि पिंकी ही 46 वर्षाची महिला हॉटेलमध्ये थांबलेले होते. रिंकू हा श्रावस्तीचा राहणारा आहे. तर पिंकी ही गौतम बुद्ध नगरमधील राहणारी आहे. पिंकी ही विवाहित आहे. दोघांनी हॉटेलची खोली घेताना प्रायव्हेट नोकरी करत असून विभागीय कामाच्या निमित्ताने या ठिकाणी आल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे हॉटेलच्या मॅनेजरने त्यांना रुम दिला होता.

वयात मोठं अंतर

हॉटेल कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, दोघांच्या वयामध्ये खूप अंतर होते. पण त्यांनी त्याबाबत कोणतीच चौकशी केली नाही. दोघेही हॉटेलात राहत होते. रोज आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यापिण्याचं सामान मागवत होते. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी चहा, नाश्ता आणि जेवणासहीत अन्य गोष्टींची ते मागणी करत होते. त्यांची वागणूकही सामान्य होती.

गुरुवारी 10 वाजता खोली नंबर 201 मधून काहीच हालचाली होताना दिसल्या नाहीत. बराच वेळपर्यंत दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी समोरचं दृश्य पाहून हादरूनच गेले. दोघांचेही मृतदेह पंख्याला लटकलेले आढळले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं.

आयुष्य का संपवलं?

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली. दोघांनी आत्महत्या का केली? याचा अंदाज पोलिसांना अजून आलेला नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तापस करत आहेत.

दोघेही हॉटेलात का थांबले होते, त्यामागची माहिती पोलीस जमा करत आहेत. हॉटेलातील रुमचा कानाकोपरा तपासून पाहत आहेत. दोघांमध्ये काय संबंध होते? याच हॉटेलमध्ये ते का थांबले? 9 दिवसानंतरच त्यांनी आयुष्य का संपवलं? दोघे एकत्र कामाला होते का? त्यांच्या कुटुंबीयांना दोघांबद्दल माहिती होती का? आदी गोष्टींचा पोलीस तपास करत आहेत. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्टही होणार आहेत.

पोलिसांनी प्रत्येक अँगलने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या दोघांच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू करण्यात येणार आहे. तसेच दोघांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅटही तपासली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Follow Us
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?