AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Singer KK death:गूढ कायम.. गायक केके मृत्यूप्रकरणी इव्हेन्ट कंपनीने झटकले हात, प्रसिद्धी पत्रकात लिहिले.. के के सरांची तब्येत तर…

कॉन्सर्टच्या वेळी बंद सभागृहात खूप गर्दी असल्याने एसी काम करत नव्हते, अशी तक्रार सोशल मीडियावर करण्यात येत होती, त्यावरही इव्हेन्ट कंपनीने स्पष्टीकरण हेत, इव्हेन्टच्यावेळी एसी काम करत असल्याचे सांगतिले आहे. इव्हेन्टसाठी क्षमतेपेक्षा जास्त लोक आले होते, हे मान्य करतानाच एसी मात्र व्यवस्थित सुरु होते, अशी सारवासारव त्यांनी केली आहे.

Singer KK death:गूढ कायम.. गायक केके मृत्यूप्रकरणी इव्हेन्ट कंपनीने झटकले हात, प्रसिद्धी पत्रकात लिहिले.. के के सरांची तब्येत तर...
singer KK death mistryImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 06, 2022 | 3:56 PM
Share

कोलकाता – कोलकात्यातील एका कॉन्सर्टनंतर सिंगर केके(Singer KK death) यांचा कार्डिएल अरेस्टमुळे मृत्यू झाला. ते एका कॉलेजच्या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी कोलकात्याला गेले होते. त्यांच्या निधनानंतर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. या कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर (social media)व्हायरल होत आहेत. यात अनेकांनी हा कार्यक्रम आयोजित केलेल्या आयोजकांना आणि इव्हेन्ट कंपन्यांवरही प्रश्न उपस्थित केले होते. आता या कॉन्सर्टच्या इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीने एक प्रसिद्धीपत्र काढले असून, त्यात केके मृत्यू प्रकरणाशी इव्हेन्ट कंपनीचा (event company letter)संबंध नसल्याचे सांगत, हात वर केले आहेत. कॉन्सर्टच्या वेळी बंद सभागृहात खूप गर्दी असल्याने एसी काम करत नव्हते, अशी तक्रार सोशल मीडियावर करण्यात येत होती, त्यावरही इव्हेन्ट कंपनीने स्पष्टीकरण हेत, इव्हेन्टच्यावेळी एसी काम करत असल्याचे सांगतिले आहे. इव्हेन्टसाठी क्षमतेपेक्षा जास्त लोक आले होते, हे मान्य करतानाच एसी मात्र व्यवस्थित सुरु होते, अशी सारवासारव त्यांनी केली आहे.

केके सरांशी जुने संबंध असल्याचा दावा

कोलकाताच्या नरजुल मंचावर केके यांचा हा कॉन्सर्ट ब्लॅकआयड इव्हेन्ट हाऊस या कंपनीने मॅनेज केला होता. सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना इव्हेन्ट मॅनेजमेंज कंपनीने लिहिले आहे की- उशिराने पोस्ट करण्यासाठी आम्ही सगळ्यांची माफी मागतो. आम्ही या घटनेच्या फॉर्मल प्रोसिजरमध्ये बिझी होतो. केके सरांशी आमचे संबंध अतिशय जुने होते. कॉन्सर्टच्या वेळी एसी चालू होते आणि पूर्ण क्षमतेने सुरु होते, नजरुल मंचमध्ये लोकांची संख्या मर्यादित आहे, मात्र जबरदस्तीने काही जण आत घुसले होते. या कॉन्सर्टचे स्थान हे कॉलेजच्या संबंधित व्यक्तींनी बुक केले होते. यात कंपनीचा कोणताही हात नाही. ऑडिटोरियमच्या बाहेर पोलीस, बाऊंसर्स त्यासह कॉलेज स्टुडंट युनियनचे लोकही होते. मात्र काही जणांनी बाहेर दगडफेक केली आणि त्यानंतर जबरदस्तीने लोकं आतमध्ये येण्यास सुरुवात केली.

परफॉर्मन्ससाठी जबरदस्ती केली नाही

केके सरांना परफॉर्मन्स करा यासाठी आम्ही जबरदस्ती केली नाही, असेही या इव्हेन्ड कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यांच्या ग्रुपमधील कोणत्याही व्यक्तीने असे वर्तन केले नव्हते, की त्यामुळे केके सर नाराज होतील, किंवा ते परफॉर्म करु इच्छित नव्हते. केके सरांनी त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स दिला होता. परफॉर्म केल्यानंतर प्रत्येक सेलिब्रिटीप्रमाणे त्यांना हॉटेलपर्यंत सोडण्यात आले होते.

सोशल मीडियावरहील वायरल व्हिडीओ फेक

परफॉर्मन्स संपेपर्यंत केके सरांना कोणताही त्रास होत नव्हता, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. अशा कॉन्सर्टमध्ये आर्टिस्ट थकून जातात आणि त्यांना लगेच गर्दीतून बाहेर काढले जाते. मात्र कॉन्सर्टबाबत काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ते खोटे असल्याचा दावा इव्हेन्ट कंपनीने केला आहे. काही सोशल मीडियावरील व्हीडिओत कॉन्सर्टनंतर लगेचच केके सरांना छातीत दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, असे व्हिडीओ चुकीचे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. हे व्हीडिओ ३१ मेच्या कॉन्सर्टचे नाहीच आहेत, असा दावाही करण्यात आला आहे.

हॉटेलात जाऊन आजारी पडले केके

कंपनीने लिहिले आहे की, परफॉर्म केल्यानंतर केके सर सरळ त्यांच्या हॉटेलवर गेले होते. तिथे पोहचल्यावरही त्यांनी त्यांच्या काही फॅन्ससोबत सेल्फी घेतल्या होत्या. केके हॉटेलात गेल्यावरच आजारी पडले, आणि ही बाब त्यांच्या मॅनेजरकडून कन्फर्म केल्याचाही दावा कंपनीने केला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.