ज्योतीचं काय घेऊन बसला? LoC वरून नागपूरची महिला 4 दिवसापासून गायब; पाकिस्तानात जाण्यासाठी मुलाला टाकून पळाली?
ज्योती मल्होत्रा या युट्यूबरला पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच, नागपूरची सुनीता जमगडे ही महिला बेपत्ता आहे. सुनीता पाकिस्तानी क्रमांकांशी संपर्कात होती, आणि ती तिच्या मुलासह कारगिलजवळ गेली होती. तिने मुलाला सोडून गेल्यावर तिचा मागमूस लागला नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे दोन्ही प्रकरणे एकमेकांशी जोडलेली असल्याचे दिसून येत आहे.

हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असून तिला अटक करण्यात आली आहे. मात्र याचदरम्यान दुसऱ्या एक महिलेच्या गायब होण्याकडेही लोकांचे लक्ष वेधले गेले असून ती चार दविसांपासून बेपत्ता आहे. पाकिस्तानी क्रमांकांशी तिने संपर्क साधल्याची पुष्टी पोलिसांनी केली होती. ती तिच्या 12 वर्षांच्या मुलासह कारगिलजवळील एका गावात पोहोचली होती. मात्र त्यानंतर त्याला तेथील हॉटेलमध्ये सोडून ती गेली ते 4 दिवस उलटूनही ती परत आलीच नाही.
यूट्यूबर ज्योति मल्होत्राला पाकसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केल्यावर तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यातून रोज नवनवे खुलासे होते असून बरीच माहितदेखील समोर येत्ये. देशाशी विश्वासघात करणाऱ्या ज्योती मल्होत्राने काही पैशांसाठी तिचं ईमान विकलं. ज्योतीच्या विश्वासघाताची सगळीकडे चर्चा असतानाच आता महाराष्ट्रातील नागपूरमधील महिलाही पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या 4 दिवसांपासून ती बेपत्ता आहे. सुनीता जमगडे नावाची ही महिला 17 मे पासून नियंत्रण रेषेजवळून (LoC) बेपत्ता आहे. ती तिच्या 12 वर्षांच्या मुलासह कारगिलजवळील एका गावात पोहोचली होती, परंतु गेल्या 4 दिवसांपासून तिची कोणतीही बातमी समजलेली नाही.
सुनीता शेवटची कारगिलमधील एका गावात दिसली होती. ती बेपत्ता होण्यापूर्वी एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होती, असे लडाखचे डीजीपी एसडी सिंह जामवाल म्हणाले. ती काही पाकिस्तानी नंबरशी संपर्कात होती असे तपासातून दिसून आलं आहे. ती सीमा पार करून पाकिस्तानात गेली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. आम्ही या प्रकरणाची सक्रियपणे चौकशी करत आहोत. तिने यापूर्वीही अटारी-वाघा बाजूने सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे यावेळी ती यशस्वी झाली असण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितलं.
मुलाला सोडून पळाली
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता तिच्या 12 वर्षांच्या मुलासोबत प्रवास करत होती, मात्र त्याला ती हुंडरमन गावात सोडून गेली होती. तिचा भाऊ सुनीलने 17 मे रोजी नागपूरमधील कपिल नगर पोलिस ठाण्यात आपली बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सध्या बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली मुलाची काळजी घेतली जात आहे आणि पोलिस सुनीताचा शोध घेण्याचा सतत प्रयत्न करत आहेत, असे भावाने सांगितलं. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
डीजीपी काय म्हणाले ?
डीजीपी जामवाल यांच्या मते, सुनीता पाकिस्तानी नागरिकांशी स्पष्ट आणि अनुचित संभाषणात सहभागी असल्याचे संकेत आहेत. तिच्याच्या आर्थिक मदतीचा स्रोत देखील स्पष्ट नाही. काही रिपोर्ट्सनुसार, सुनीता हिला सीमा ओलांडण्यास मदत केल्याबद्दल एका रहिवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे, परंतु तिने सीमा ओलांडल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. शोध मोहीम सुरू आहे असे अधिकाऱ्याने सांगितलं. सुनीता एक नर्स आहे. ती नागपूरमधील एका रुग्णालयात काम करायची. ती लडाखला कशी पोहोचली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.