Narendra Modi: भारतात नवीन शिक्षण पद्धत लागू होणार? मेकॉलेवर टीका करताना पंतप्रधान मोदी यांचे मोठे संकेत

New Education System Implemented?: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर धर्मध्वजाचे आरोहण झाले. यावेळी त्यांनी भाषणातून शिक्षण पद्धतीतील मोठ्या बदलाचे संकेत दिले. काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Narendra Modi: भारतात नवीन शिक्षण पद्धत लागू होणार? मेकॉलेवर टीका करताना पंतप्रधान मोदी यांचे मोठे संकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिक्षण पद्धत
| Updated on: Nov 25, 2025 | 1:32 PM

PM Modi Criticized Lord Macaulay: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर धर्मध्वजाचे (Ram Mandir Dhwaj) आरोहण करण्यात आले. ध्वजपताका आकाशात डौलात फडकली. राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला. अनेक दिवसांपासून देशातील अभ्यासक्रमातील बदलांची नांदी आपण पाहत आहोत. आता शिक्षण पद्धतीच बदलण्यात येणार का? याची चर्चा पंतप्रधानांच्या आजच्या भाषणानंतर सुरू झाली आहे.

नवीन शिक्षण पद्धत लागू होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीवर आज कडाडून प्रहार केला. मेकॉले याने भारतात मानसिक गुलामीची पायाभरणी केली. दहा वर्षानंतर म्हणजे २०३५ मध्ये त्या अपवित्र घटनेला २०० वर्ष पूर्ण होत आहे. काही दिवसापूर्वी मी एका कार्यक्रमात म्हटलं होतं की येत्या १० वर्षात भारताला गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त करायचं आहे, असे मोठे संकेत पंतप्रधानांनी अयोध्येतून दिले.

गुलामीच्या मानसिकतेतून मुक्तता

दहा वर्षाचं टार्गेट ठेवायचं आहे. सर्वात मोठं दुर्देव म्हणजे मॅकेलेने जो ठरवलं होतं त्याचा प्रभाव अधिक होता. आपल्याला स्वातंत्र मिळालं पण हिन भावना गेली नाही. एक विकार आला, तो म्हणजे परदेशी गोष्टी चांगल्या आहेत. आणि देशातील गोष्टी वाईट आहे. आपण परदेशातून स्वातंत्र्य घेतलं. आपलं संविधानही विदेशातून प्रेरित आहे, असं सांगितलं जातं. पण वास्तव हे की भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाही आपल्या रक्तात आहे. डीएनएमध्ये आहे. तामिळनाडूतील एका गावात शिलालेख आहे. त्यात त्या काळातही लोकशाही पद्धतीने शासन व्यवस्था चालत होती. लोक कसे सरकार निवडत होते. आपल्याकडे भगवान बसवण्णा यांच्या अनुभव मंडपावरही लक्ष दिलं गेलं नाही. या अनुव मंडपात सार्वजनिकपणे निर्णय घेतले गेले. पण गुलामीच्या मानसिकतेमुळे त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, याकडे पंतप्रधानांनी सर्वांचं लक्ष वेधलं.

छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण

भारतीय नौदलाच्या ध्वजावर असे प्रतिक होते की ज्याचा आपल्या शक्तीसी, वारश्याशी काहीच संबंध नव्हता. आम्ही हे प्रतिक हटवले. आपण शिवाजी महाराजांशी संबंधित प्रतिक घेतले. केवळ डिझाईनमध्ये बदल केला नाही तर मानसिकता बदलण्याचं हे काम होतं, असे मोदी म्हणाले.

हेच परिवर्तन आज अयोध्येतही दिसत आहे. ज्यांनी रामत्व नाकारलं ही गुलामीची मानसिकता आहे. भारत वर्षाच्या प्रत्येक कणाकणात राम आहे. पण गुलामीच्या मानसिकतेने प्रभू रामालाही काल्पनिक म्हटलं गेलं. आपण ठरवलं तर येत्या १० वर्षात आपण मानसिक गुलामीतून मुक्ती मिळवू शकू. तेव्हा २०४७ पर्यंत भारताला विकसित भारत करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. मॅकालेच्या गुलामीच्या प्रोजेक्टला हटवू तेव्हाच आपला देश प्रगतिशील होईल, यावर पंतप्रधानांनी जोर दिला.

आता विकसीत भारताचे ध्येय

गेल्या ११ वर्षात महिला, दलित, मागास अति मागास, वंचित आदिवासी, श्रमिक आणि युवा प्रत्येक वर्गाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवलं. देशातील प्रत्येक व्यक्ती आणि वर्ग सशक्त झाला तरच संकल्पाच्या सिद्धीला सर्वांचे हातभार लागेल. २०४७ मध्ये देश स्वातंत्र्याचा जल्लोष करेल. १०० वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल. तोपर्यंत आपल्याला विकसित भारत व्हायचं आहे. येत्या १००० हजार वर्षासाठी आपल्याला भारताचा पाया मजबूत करायचं आहे. आपल्याला वर्तमानासह भावी पिढ्यांबाबत विचार करायचा आहे. आपण नव्हतो तेव्हाही देश होता. आपण नसणार तेव्हाही देश राहिल. आपण जिवंत समाज आहोत. आपल्याला दूरदृष्टीने काम करायचं आहे. आपल्याला येणारे शतक, दशक लक्षात ठेवावे लागेल, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

रामच आपल्या सर्वांचा आदर्श

त्यासाठी आपल्याला रामाचं व्यक्तित्व समजलं पाहिजे. त्यांचा व्यवहार समजला पाहिजे. राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे मर्यादा, राम म्हणजे सर्वोच्च चरित्र, सत्य आणि पराक्रमाचा संगम हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. राम म्हणजे जनतेचं सुख सर्वोच्च ठेवणं. राम म्हणजे धर्म आणि दया. राम म्हणजे ज्ञान आणि विवेकाची पराकाष्ठा, राम म्हणजे कोमलतेत दृढता. राम म्हणजे कृतज्ञतेचं सर्वोच्च उदाहरण. राम म्हणजे श्रेष्ठ संगतीची निवड. राम म्हणजे विनम्रतेत महाबल. राम म्हणजे सत्याचा संकल्प. राम म्हणजे जागरुक आणि शिस्तबद्धता, निष्कपट मन. राम केवळ फक्त एक व्यक्ती नाही. मूल्य आहे. मर्यादा आहे. दिशा आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित करायचं असेल. समाजाला सामर्थ्यवान बनवायचा असेल तर आपल्यातील राम जागृत केला पाहिजे. हा संकल्प करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. हा दिवस सोनेरी दिवस आहे. २१ व्या शतकातील अयोध्या विकसित भारताचं केंद्र आहे. रामराज्याने प्रेरित भारत घडवायचा आहे. स्वहितापेक्षा राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्यावरच हे शक्य होईल. त्याशिवाय हे शक्य होणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.