गरीब कल्याण अन्न योजनेला 6 महिन्यांची मुदतवाढ, Narendra Modi यांची मोठी घोषणा

गरीब कल्याण अन्न योजनेला 6 महिन्यांची मुदतवाढ, Narendra Modi यांची मोठी घोषणा
नरेंद्र मोदी
Image Credit source: Tv9 Marathi

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 6 महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 26, 2022 | 9:37 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. आजच्या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला (Pradhan Matri Garib Kalyan Ann Yojana) सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळं ही योजना आता सप्टेंबर 2022 पर्यंत सुरु राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन यांसंदर्भात महाहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विटवर एक संदेश देखील दिला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे 80 कोटी नागरिकांना लाभ झाल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलंय. भारतवर्षाचं सामर्थ्य देशातील एक एक नागरिकाच्या शक्तीमध्ये आहे. त्या शक्तीला ताकद देण्यासाठी सरकारनं या योजनेला मुदतवाढ दिल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदींचं ट्विट

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना अतंर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याद्वारे 80 कोटी नागरिकांना मोफत राशन दिलं जातं. या योजनेतील नागरिकांना रेशनकार्डवर मोफत राशन दिलं जातं. या योजनेद्वारे तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रति व्यक्ती दिला जातो.

गरीब कल्याण योजनेंतर्गत 80 कोटी भारतीयांना राशन मिळणार

केंद्र सरकारकडून देण्यात गरीब कल्याण योजनेद्वारे देण्यात येणार धान्य देशातील 80 कोटी नागरिकांना देण्यात येतं. ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड आहे त्यांना धान्य मिळतं. ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड नाही त्यांना या योजनेद्वारे धान्य मिळत नाही. कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु करण्यात आली होती.

इतर बातम्या :

गोंदिया जिल्ह्यात कुपोषणाची स्थिती गंभीर, वर्षभरात 1 हजार 567 बालकांची नोंद! महिला व बालविकास विभागासमोर मोठं आव्हान

मोफत रेशन कोणाला, कसे आणि किती काळ मिळणार? ही योजना नेमकी काय आहे ते जाणून घेण्यासाठी या गोष्टी माहिती करुन घ्या


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें