हिमाचलमधील पराभवावर भाष्य ते घराणेशाहीवर निशाणा, नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिलं ‘हे’ आश्वासन

"हिमाचलच्या नागरिकांचा आभारी आहे. हिमाचलमध्ये एका टक्क्याहून कमी अंतराने पराभव झालाय. याआधी इतक्या कमी अंतरात सरकार बदलेलं नाही", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

हिमाचलमधील पराभवावर भाष्य ते घराणेशाहीवर निशाणा, नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिलं 'हे' आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 8:28 PM

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर आला. या निकालानुसार भाजपचा गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय झाला. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली. भाजपच्या हातून सत्ता निसटली. हिमाचलमधील सत्ता हातून निसटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या नागरिकांना उद्देशून महत्त्वाचं आश्वासन दिलं. दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात आज विजयोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी मोदी बोलत होते.

“हिमाचलच्या नागरिकांचा आभारी आहे. हिमाचलमध्ये एका टक्क्याहून कमी अंतराने पराभव झालाय. याआधी इतक्या कमी अंतरात सरकार बदलेलं नाही”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“हिमाचलमध्ये दर पाच वर्षात सरकार बदलतं. पण फरक मोठा असतो. पण इथे फक्त एक टक्क्यापेक्षा कमी अंतर आहे. याचाच अर्थ जनतेने भाजपला चांगला प्रतिसाद दिलाय”, असंदेखील मोदी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मी हिमाचलच्या नागरिकांना आश्वासन देतो की, निवडणुकीत आम्ही एक टक्क्याने कमी ठरलो असलो तरी आम्ही विकासासाठी सर्वात पुढे राहू”, असं आश्वासन त्यांनी दिलं.

‘कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे चारही बाजूला विजयाचा सुगंध’

“मी सगळ्यात आधी जनता जनार्धनासमोर नतमस्तक आहे. जनतेचा आशीर्वात अभूतपूर्व असा आहे. जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतलंय त्याचा सुगंध आज आम्ही चारही बाजूने अनुभवतोय. जिथे भाजप प्रत्यक्ष नाही जिंकला, तिथे भाजपचे मतदार भाजपच्या स्नेहाचा साक्षी आहे. मी जनतेचा विनम्रतेने आभार मानतो. या निवडणुकीत भाग घेणारे प्रत्येक राजकीय कार्यकर्ते आणि पक्षाचा आभार मानतो.”, अशा शब्दांत मोदींनी आभार मानले.

“मी दिल्लीचं वर्णन ऐकलं. दिल्लीत जनतेला धोका दिला. आम्ही तसं काम करत नाहीत. हिमाचलसाठी भारत सरकार प्रतिबद्ध आहे. भाजपला मिळालेलं जनतेचं समर्थन यासाठी महत्त्वाचं आहे, कारण भारताने आता अमृतकाळात प्रवेश केलेला आहे”, असं मोदी म्हणाले.

“भाजप ‘ती’ धमक ठेवतो”

“येणारे २५ वर्ष हे फक्त विकासाच्या राजकारणावर असणार आहे. भाजपचं समर्थन तरुणांच्या नव्या विचारांचं प्रतिक आहे. भाजपला मतदान म्हणजे दलित, वंचित, सोशितांचं सशक्तिकरण आहे. लोकांनी भाजपला मत दिलं कारण भाजप देशाच्या हितासाठी मोठ्यात मोठं आणि कठोरात कठोर निर्णय घेण्याची धमक ठेवतो”, असं मोदी म्हणाले.

मोदींचं घराणेशाहीवर भाष्य

“भाजपचं वाढतं जनसमर्थन हे दाखवतं की घराणेशाही आणि भ्रष्टाचारविरोधात जनआक्रोश वाढत आहे. मी या गोष्टीला लोकशाहीच्या दृष्टीकोनाने शुभ संकेत म्हणून पाहतो. यावेळी खरंच गुजरातमध्ये कमाल झालं. मी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना धन्यवाद मानतो. गुजरातच्या जनतेचं आभार मानतो”, असं देखील ते म्हणाले.

‘भूपेंद्रने नरेंद्रचा रेकॉर्ड तोडला’

“निवडणुकीच्यावेळी गुजरातच्या जनतेला सांगितलं होतं की यावेळी नरेंद्रचा रेकॉर्ड तोडला पाहिजे. भूपेंद्र नरेंद्रचा रेकॉर्ड तोडेल यासाठी नरेंद्र प्रयत्न करेल. गुजराच्या जनतेने रेकॉर्डचा रेकॉर्ड केला. गुजरातच्या इतिहासातील सर्वाधित जनादेश भाजपला देवून गुजरातच्या जनतेने नवा इतिहास रचला आहे. अडीच दशक सत्तेत असताना गुजरातच्या नागरिकांनी दिलेला हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे”, असं मोदी म्हणाले.

‘तरुणांनी भाजपला पारखलं’

“भाजप गुजरातच्या प्रत्येक कुटुंबाचा भाग आहे. गुजरातमध्ये यावेळे एक कोटी पेक्षा जास्त असे मतदार होते ज्यांनी मतदान केलं, पण ते हे मतदार होते ज्यांनी कधीच काँग्रेस शासनाला पाहिलं नव्हतं. त्यांनी फक्त भाजप सरकारला पाहिलं होतं. तरुण प्रश्न विचारतात, शाहनिशा करतात आणि मग मतदान करतात. ते अनुभवाशिवाय मतदान करत नाहीत. त्याना सरकारचं काम प्रत्यक्ष नजर येतं तेव्हा ते मतदान करतात. म्हणून तरुणांनी भाजपला सर्वाधिक प्रमाणात मतदान केलंय. याचाच अर्थ तरुणांनी आमच्या कामाची पारख केलीय आणि विश्वास ठेवलाय”, असा दावा त्यांनी केला.

“तरुणांना भाजप हवंय. तरुण जातीवाद आणि परवारवादाने भडकत नाहीत. ते फक्त विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा देतात. भाजप विकासच्याप्रती प्रतिबद्ध आहे”, असादेखील दावा त्यांनी केला.

नरेंद्र मोदी आणखी काय-काय म्हणाले?

“जेव्हा महामारीच्या घोर संकटवेळी बिहारमध्ये निवडणूक झाली होती तेव्हा जनतेने भाजपला भरपूर प्रतिसाद दिला. आसाम, युपी, गोवा, मणिपूर असे एकापाठोपाठच्या निवडणुकीत जनतेने भाजपचीच निवड केली. देशाची जनतेचा भरोसा फक्त भाजपवर आहे.”

“मी मोठमोठ्या तज्ज्ञांना आठवण करु देऊ इच्छित आहे की, गुजरात निवडणुकीत भाजपचं आवाहन होतं विकसित गुजरातपासून विकसित भारताचं निर्माण. गुजरातच्या निकालाने सिद्ध केलंय की, सामान्य नागरिकात विकसित भारतासाठी किती प्रबळ आकांक्षा आहे. विचार स्वच्छ आहे. देशासमोर जेव्हा एखादं आव्हान असतं तेव्हा देशाच्या जनतेचा भाजपवर विश्वास असतो. जेव्हा देश मोठे लक्ष्य निश्चित करतो तेव्हा देशवासियांचा विश्वास हा भाजपवर असतो”.

“आम्ही जिथे पोहोचलोय, राज्य असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा केंद्रात असो, आम्ही असेच पोहोचलेलो नाहीत. पाच-पाच पिढी तपस्या करत, कुटुंब खपले तेव्हा हा पक्ष बनला. तेव्हा आम्ही इथे पोहोचलो. भाजपसाठी लाखो समर्पित कार्यकर्त्यांनी आपलं जीवन समर्पित केलंय. वैयक्तिक महत्त्वकांक्षा, आयुष्य आणि सुख या सगळ्यांना तिलांजली देऊन कार्यकर्ता समाज आणि देशाला सशक्त करण्यासाठी काम करत आहे.”

“भाजप आपल्या कार्यकर्त्यांच्या संघटनशक्तीवर विश्वास ठेऊनच रणनीती बनवतं आणि यशस्वी होतं. अनेक उतारचढाव आले. पण आम्ही आदर्श आणि मुल्यांवर राहणं पसंत केलंय. गेल्या आठ वर्षात देशात एक खूप मोठा बदल अनुभवण्यात आलाय. हा बदल कार्य आणि कार्यशैलीचा आहे. भाजप सरकार कामाला लहान मानत नाही. भाजप सरकारांनी गरिबांसाठी पक्के घर, शौचालय, मोफत जेवण, उपचार, इंटरनेट अशा अनेक मुलभूत सुविधांना महत्त्व दिलं. या गोष्टींकडे पूर्वी बघितलं जात नव्हतं. दुर्लक्ष केलं जात होतं. त्यामुळे आज प्रत्येक वर्गापर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी तंत्रज्ञानाता भरपूर उपयोग केला जातोय.”

“आम्ही फक्त घोषणा करत नाही. आम्ही राष्ट्रनिर्माणाच्या व्यापक मिशनसाठी पुढे निघालो आहोत. त्यामुळे फक्त पाच वर्षाच्या राजकीय नफा-तोट्याला बघून आम्ही घोषणा करत नाही. आमच्या प्रत्येक घोषणेमागे दूरदृष्टीचा विचार असतो. आज शॉर्टकट नकोय. देशाचा मतदार चांगल्याप्रकारे ते जानतो. देशात आज कोणताही संशय नाही. देश समृद्ध झाला तर सगळ्यांची समृद्धी होणार हे निश्चित आहे.”

“जे राजकीय पक्ष स्वत:च्या तात्पुरत्या फायद्यासाठी समाजात भेद निर्माण करुन राष्ट्रासमोर नवी समस्या निर्माण करतात त्यांना देशाची जनता, तरुण पिढी पाहत आहे. भारताचं भविष्य फॉल्ट लाईन्सला वाढवून नाही तर त्या लाईन्स कमी करुन चांगलं होणार आहे. कधी भाषा, क्षेत्र, खाद्यपदार्थ अशा अनेक विविध कारणांमुळे वाद निर्माण केला जातो. पण एकत्र जुडण्यासाठी एकच कारण भरपूर आहे ते म्हणजे ही मातृभूमी आणि हा देश. हा आमचा भारत आहे. भाषा, क्षेत्रासाठी भांडण होतील, पण मातृभूमी सर्वांना एक ठेवते.”

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.