AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बंगालमध्ये ओबीसीमधील 179 पैकी 118 जाती मुस्लिमांच्या’, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांकडून मोठा खुलासा

"कोलकता उच्च न्यायालयात OBC जातींच्या 179 पैकी 118 जाती मुस्लिम बांधवांच्या असल्याचं दिसून आलं. आम्ही त्याचा 2023 पासून पाठपुरावा करत होतो. आम्ही कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो", असं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले आहेत.

'बंगालमध्ये ओबीसीमधील 179 पैकी 118 जाती मुस्लिमांच्या', राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांकडून मोठा खुलासा
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांकडून ओबीसी आरक्षणाबाबत खुलासा
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: Chetan Patil | Updated on: May 28, 2024 | 3:42 PM
Share

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी पश्चिम बंगाल बंगालमधील ओबीसी समाजाच्या नागरिकांवर ममता सरकारने अन्याय केल्याचा आरोप केला आहे. हंसराज अहिर यांनी कोलकाता हायकोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “कोलकाता हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून स्वागत करत आहे. मूळ OBC वर्गाचा अधिकार पश्चिम बंगालमधील ममता सरकारने कमी करत त्यांच्यावर अन्याय केला होता. तो अन्याय कोर्टाच्या निर्णयाने थांबवल्याचं आयोगाचं मत आहे. मूळ जातींचा अधिकार गैर मार्गाने गैर लोकांना दिला होता हे हायकोर्टाच्या निर्णयाने दिसून आलं”, असं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले.

“कोलकता उच्च न्यायालयात OBC जातींच्या 179 पैकी 118 जाती मुस्लिम बांधवांच्या असल्याचं दिसून आलं. आम्ही त्याचा 2023 पासून पाठपुरावा करत होतो. आम्ही कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो”, असं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले आहेत. तसेच “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये आमच्या आयोगाला विशेष दर्जा दिला”, असंदेखील हंसराज अहिर यांनी सांगितलं.

‘…तर ती सूची आम्ही रद्द ठरवू’

“घराघरात जाऊन सर्वेक्षण केलं पाहिजे होतं. पण असं सर्वेक्षण न करता आम्हाला काहीही अहवाल दिला नाही. आमच्या केंद्रीय सूचित बंगाल सरकारने 37 जातींची पाठवलेली यादी आहे. त्यात 35 मुस्लिम बांधवाच्या आहेत तर फक्त 2 हिंदू बांधवांच्या आहेत. 2010 नंतरची ती सूची असेल तर ती आम्ही रद्द ठरवू. मूळ OBC वर्गाचा अधिकार पश्चिम बंगाल सरकारने कमी करत त्यांच्यावर आन्याय केला होता तो आम्ही थांबवला आहे”, असा दावा हंसराज अहिर यांनी केला.

‘ओबीसीमध्ये बांगलादेशमधून आलेल्या अनेक जातींचा समावेश’

“मत बँक वाढवण्याचा प्रयत्न आहे की नाही हे दिसून येत आहे. ओबीसीमध्ये बांगलादेशमधून आलेल्या अनेक जातींचा समावेश आहे. हे आम्हाला पत्रकातून दिसून आलं. जोडलेल्या यादीत 97 टक्के मुस्लिम असल्यामुळे ते बांगलादेशी आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही”, असा दावा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी केला.

Follow Us
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी