AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदारांच्या निलंबनानंतर शरद पवार आक्रमक; म्हणाले, जनता सारं पाहातेय…

Sharad Pawar on MP Suspended from Parliament : हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेच्या 141 खासदारांचं निलंबन केलं गेलं. याविरोधात विरोधकांना आवाज उठवला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार नेमकं काय म्हणाले? वाचा...

खासदारांच्या निलंबनानंतर शरद पवार आक्रमक; म्हणाले, जनता सारं पाहातेय...
Sharad Pawar on MP Suspended from Parliament Latest Marathi News
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 21, 2023 | 2:01 PM
Share

संदिप  नवी दिल्ली | 21 डिसेंबर 2023 : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान 141 खासदारांना निलंबित केलं गेलं आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राजधानी दिल्लीत संसदभवन परिसरात विरोधकांनी आंदोलन केलं. संसदेपासून विजय चौकापर्यंत विरोधी पक्षातील खासदारांनी मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आक्रमक होत आपली भूमिका मांडली आहे. जनता सगळं पाहते आहे. जनता या सगळ्यांना धडा शिकवेल. जनता सारं सूद समेत वसूल करेल, असं शरद पवार म्हणालेत. 13 डिसेंबर रोजी लोकसभेत गोंधळ झाला. त्याबाबतही शरद पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच निलंबनाच्या कारवाईवरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संसदेत जो गोंधळ झाला ते लोक सभागृहाचे सदस्य नव्हते. मग ते सभागृहात कसे आले. ते खासदाराच्या पासवर लोकसभेत आले होते. याबाबत सरकारकडून कोणतही स्टेटमेंट येण गरजेचं होतं. पण ते आलं नाही. विरोधी पक्षातील लोकांनी त्याबाबत स्पष्टीकरण मागितलं. पण ते दिलं गेलं नाही. याबाबत प्रश्न विचारले तर खासदारांना निलंबित केलं गेलं. हे अत्यंत चूक आहे, असं शरद पवार म्हणाले.

विरोधी पक्षांचीही काही जबाबदारी असते. तीच जबाबदारी पार पाडत असताना खासदारांना निलंबित केलं गेलं. देशाची जनता हे सारं पाहत आहे. या सगळ्याची किंमत जनता वसूल करेन, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

संसदेतून खासदारांना निलंबित केल्यानंतर विरोधी पक्षातील खासदारांनी अंदोलन केलं. यावेळी कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची मिमिक्री केली. याचा व्हीडिओ राहुल गांधी यांनी शूट केला. यावरून बरीच टीका झाली. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही योग्य गोष्ट आहे. ते लोकसभेच्या सभागृहात नव्हते. सभागृहाच्या बाहेर काही झालं. यावर चर्चा होऊ शकते. मात्र राहुल गांधी यांनी जो व्हीडिओ शूट केला ती घटना सभागृहातला नव्हती. ते सगळं सभागृहाबाहेर झालं होतं. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचं काम नाही, असं शरद पवार म्हणालेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?