AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एनडीएने सरकार स्थापनेचा केला दावा, या पक्षांकडून मोदींना पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींकडे सादर

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. एनडीएकडून आज सरकार स्थापनेचा दावा केला गेला असून एनडीएमधील घटक पक्षांनी समर्थनाचे पत्र राष्ट्रपतींना सुपूर्त केले आहे. त्यानंतर आता ९ जून रोजी मोदी सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.

एनडीएने सरकार स्थापनेचा केला दावा, या पक्षांकडून मोदींना पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींकडे सादर
| Updated on: Jun 07, 2024 | 4:11 PM
Share

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आता एनडीएने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. एनडीएने राष्ट्रपतींना पाठिंब्याचे पत्र सादर केले आहे. त्यामुळे आता 9 जून रोजी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 543 सदस्यांच्या लोकसभेत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत तर एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. एनडीएकडे बहुमताचा आकडा असल्याने त्यांनी आज सरकार स्थापनेचा दावा केलाय.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात एनडीएचा नेता म्हणून तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड मोदी यांनी निवड करण्यात आली आहे. मोदी म्हणाले की, पुढील काळात त्यांचे सरकार सुशासन, विकास, जीवनमान आणि किमान गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करणार आहे. येत्या 10 वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर लक्ष केंद्रित केले जाईल. परस्पर विश्वास हा या आघाडीचा गाभा असून सर्व पंथ समभाव या तत्त्वाशी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

एनडीएला विजय कसा पचवायचा हे चांगले ठाऊक आहे, असा दावा करून मोदी म्हणाले, “युतीच्या इतिहासातील संख्येच्या दृष्टीने पाहिल्यास हे सर्वात मजबूत आघाडीचे सरकार आहे.” विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही कधीही हरलो नाही. 4 जूननंतरचे आमचे आचरण दाखवते की आम्हाला विजय कसा पचवायचा हे माहित आहे.”

आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) एन चंद्राबाबू नायडू, जनता दल (युनायटेड)चे नितीश कुमार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान, जनता दल (एस)चे एचडी कुमारस्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, अपना दल (एस) च्या अनुप्रिया पटेल, जनसेना पक्षाचे पवन कल्याण आणि भाजपचे नवनिर्वाचित सदस्य आणि एनडीएच्या इतर मित्रपक्षांनी सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ९ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार आहे. या शपथविधीसाठी अनेक देशाचे प्रमुख देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

&

;

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची देखील भेट घेतली.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.