NEET 2026 : नीट परीक्षा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, आता परीक्षेची जबाबदारी लष्करावर? केंद्र सरकारचं मोठं पाऊल

वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या परीक्षेचे पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली होती, शेवटी ही परीक्षा रद्द करण्यात आली. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

NEET 2026 : नीट परीक्षा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, आता परीक्षेची जबाबदारी लष्करावर? केंद्र सरकारचं मोठं पाऊल
नीट पेपर प्रकरणात मोठी अपडेट
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 28, 2026 | 3:45 PM

वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली होती, शेवटी ही परीक्षा रद्द करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे आता पुन्हा असा प्रकार घडू नये, त्यासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीमध्ये आहे. या परीक्षेची जबाबदारी आता लष्कराकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी परीक्षेत पुन्हा पेपर लीक होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारकडून लष्करावर परीक्षेच्या पेपरची सुरक्षितता आणि गुप्तता याची जबादारी सोपवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह काही महत्त्वाचे मंत्री तसेच अधिकाऱ्यांची उच्चस्थरीय बैठक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

आतापर्यंत 13 जणांना अटक 

नीट पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर येताच राज्यात मोठी खळबळ उडाली होती. शेवटी सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी ही केंद्राकडून सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयने 13 जणांना अटक केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या देखील काही जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये मनिषा हवालदार, मनिषा मांढरे, शिवराज मोटेगावकर, पीव्ही कुलकर्णी यांना सीबीआयने अटक केली आहे. दरम्यान यांच्या चौकशीमधून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप 

दरम्यान नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आल्यानं सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं वातावरण असून, संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून होत आहे. मात्र त्यानंतर आता खबरादीचा उपाय म्हणून या परीक्षेची जबाबदारी आता भारतीय सैन्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे.

 

 

Follow Us