AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2024 सालच्या नीट पेपर फुटीप्रकरणी संजीव मुखिया यांविरोधात पुरावे नाहीत, CBI च्या तपासात समोर!

2024 साली नीट यूजी परीक्षेत पेपरफुटी झाली होती. पाटण्यात एका शाळेच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांकडे या परीक्षेचा पेपर अगोदरच पोहोचला होता. पेपरफुटीचे हे प्रकरण समोर आल्यानंतर बिहार पोलिसांनी काही विद्यार्थी तसेच पेपरफुटी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं होतं.

2024 सालच्या नीट पेपर फुटीप्रकरणी संजीव मुखिया यांविरोधात पुरावे नाहीत, CBI च्या तपासात समोर!
NEET PAPER LEAK 2024 SANJEEV MUKHIYAImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2026 | 9:55 PM
Share

NEET Paper Leak : 2024 मध्ये बिहार पोलिसांनी NEET (UG) 2024 परीक्षेची प्रश्नपत्रिका चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आणला आणि त्यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासात संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता, कारण ते यापूर्वीही इतर काही परीक्षा प्रश्नपत्रिका चोरी किंवा गळतीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचे आढळले होते. परंतु आता कोणताही सबळ पुरावा न आढळल्याने त्यांच्याविरोधात कोणतेही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. संजीव मुखिया यांना आता जामीन मिळाला आहे. CBI च्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतरही ते बिहार पोलिसांकडून तपास सुरू असलेल्या इतर प्रकरणांमुळे न्यायालयीन कोठडीतच राहणार आहेत.

2024 साली झालेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्यांना आरोपी म्हणून नमूद करण्यात आले होते. यानंतर या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान CBI ने NEET (UG) 2024 ची चोरी झालेली प्रश्नपत्रिका चोरणे, तिचे वितरण करणे तसेच त्या प्रश्नपत्रिकेचा फायदा घेणारे सर्व उमेदवार यांची ओळख पटवली. त्यानुसार, CBI ने पटणा येथील संबंधित न्यायालयात 45 जणांविरुद्ध अनेक आरोपपत्रे (चार्जशीट) दाखल केली होती.

तपासादरम्यान CBI ला संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया यांचा NEET (UG) 2024 प्रश्नपत्रिका चोरी किंवा वितरणात सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. मधल्या काळात संजीव मुखिया फरार होते. त्यानंतर बिहार पोलिसांनी इतर प्रकरणांमध्ये त्यांना अटक केली. NEET-UG 2024 प्रकरणातील एफआयआरमध्ये त्यांचे नाव आरोपी म्हणून असल्यामुळे CBI ने त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवले होते. मात्र, तपासादरम्यान NEET-UG 2024 प्रकरणात त्यांच्या सहभागाचा कोणताही पुरावा समोर न आल्याने CBI ने या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध कोणतेही आरोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला. CBI ने NEET (UG) 2024 प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व संबंधित आरोपींची ओळख पटवली असून, त्यांच्यापैकी कोणालाही कायद्याच्या प्रक्रियेतून सुटू दिलेले नाही, असे स्पष्ट केले आहे.

2024 सालचं पेपरफुटी प्रकरण काय होतं?

2024 साली नीट यूजी परीक्षेत पेपरफुटी झाली होती. पाटण्यात एका शाळेच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांकडे या परीक्षेचा पेपर अगोदरच पोहोचला होता. पेपरफुटीचे हे प्रकरण समोर आल्यानंतर बिहार पोलिसांनी काही विद्यार्थी तसेच पेपरफुटी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं होतं.  सर्वात अगोदर झारखंडमधील हजारीबाग येथून हा पेपर लीक करण्यात आला होता. त्यानंतर लाखो रुपये घेऊन नंतर हा पेपर वाटण्यात आला होता.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच