AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यासमोर साक्षात मृत्यु, महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंब…. ती दृश्य पाहून काळजाचा उडेल थरकाप, Video पाहिला का?

Nepal Flash Flood: नेपाळच्या महापूराची थरकाप उडवणारी व्हिडिओ मानव निसर्गापुढे किती थिटा आहे याची साक्ष देतात. असाच अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ झपाट्यानं व्हायरल झालं आहे. या कुटुंबाला साक्षात मृत्यूचं दर्शन घडलं आहे.

डोळ्यासमोर साक्षात मृत्यु, महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंब.... ती दृश्य पाहून काळजाचा उडेल थरकाप, Video पाहिला का?
डोळ्यासमोर साक्षात मृत्यु, महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंबImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 28, 2026 | 3:10 PM
Share

नेपाळवर निसर्ग कोपला आहे. महापूराने उत्तरी नेपाळमध्ये होत्याचे नव्हते केले. पाण्याचा जोरदार लोट पाठिमागून येते असताना जीवाच्या आकांताने धावणारी माणसं पाहून तुमचंही मन हेलावलं असेल. भोटोकोशी आणि त्रिशुलाने उत्तर नेपाळमध्ये मृत्यूचे तांडव घडवले. गावंची गावं नेस्तनाबूत झाली. पूलं, रस्ते आणि वसाहती काडी कचपटासमान वाहून गेली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. येथील काही भयावह व्हिडिओने अनेकांच्या काळजात धस्स झालं. अशाच एका व्हिडिओने अनेकांच्या अंगावर काटा आणला. या तुफान व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक मजली घराच्या वरच्या बाल्कनीत जीव मुठीत घेऊन उभे ठाकलेले कुटुंब दिसत आहे. या कुटुंबाला जणू साक्षात मृत्यूचं दर्शन घडलं आहे.

काय आहे त्या व्हिडिओत?

हा व्हिडिओ नेपाळचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातील दृश्य काळचाजे पाणी पाणी करणारे आहे. या घराच्या पाठीमागून ढिगाऱ्यासह काळेकुट्ट पाणी आक्रळविक्राळ रूप घेऊन वाहताना दिसत आहे. हे घर एक मजली आहे. खालच्या मजल्याला महापूराच्या पाण्याने वेढा दिला आहे. घराच्या शेजारील पत्र्याची घरं, वसाहतीत पाणी शिरल्याने ती घर तरंगत असल्याचे दिसतंय. या घराच्या पाठीमागे मृत्यूच जणू वाहत आहे. महापूराच्या अजस्त्र लाटा या घराला जणू गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दृश्य समोरील भागातून कोणीतरी टिपलं आहे.

या घराच्या समोरून महापूराच्या पाण्यात एक लहान टेम्पो अलगद वाहून जाताना दिसतो. जणू ते एखादी खेळण्यातील गाडी आहे, तशी ती झटक्यात डोळ्यासमोरून वाहून जाताना दिसते. मृत्यू कधी कवटाळेल याची काहीच खात्री नसताना या घराच्या बालकनीत हे कुटुंब अक्षरशः जीव मुठीत घेऊन हताशपणे सर्व पाहताना दिसत आहे. अजस्त्र लाटा आजूबाजूची घरं कवेत घेत असताना एक छोटा मुलगा, पती-पत्नी या दृश्याकडे बघून आता पुढे काय होणार याचा मनाशी उगाच खेळ करताना दिसत आहे. त्यांच्यासमोरच्या गल्लीतून छोटे ट्रेक, कार, घरावरील पाण्याच्या टाक्या अखरेच्या घटका मोजताना दिसत आहेत. पाण्याच्या अजस्त्र प्रवाहात ते हेलकावे खाताना दिसत आहेत.

काळ्या लाटांचे तडाखे

तितक्यात या घराला पाठीमागून महापूराच्या काळ्या लाटांचे तडाखे बसताना दिसत आहे. या घरात इनमीन तीन सदस्य टिपल्या गेली आहेत. तर त्याचवेळी या घराच्या भिंतीला पूराच्या अजस्त्र लाटा धडकी मारताना दिसतात. तेव्हा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. कारण पाठीमागील दृश्य अत्यंत भयावह आहे. त्यापुढे जसा कॅमेरा सरकतो, अनेक घरांना या लाटा कवेत घेताना दिसते. यातील पती-पत्नी आणि त्यांचे अपत्य यांना या मृत्यूची जणू चाहूल लागलेली आहे. काळ खायला उठलेला असतानाच त्यांच्या आणाभाका होताना दिसतात. त्यांना मृत्यूची कल्पना आलेली दिसते. त्वेषाने महापुराच्या लाटा ते घर गिळंकृत करण्यासाठी झपाट्याने पुढे सरसावताना दिसतात. तसा तसा पाहणाऱ्यांचा जीव सुद्धा वर खाली होतो. निसर्गापुढे आपण किती कसपटासमान आहोत ही काळीज हेलावणारी ही दृश्य पाहिल्यावर लक्षात येते.

या घराच्या वरच्या बाजूला एक सोलर पॅनल, पाण्याची टाकी, छोटसं गार्डन दिसतं. निसर्गाच्या या दोन रुपाच्या प्रतिमेत आपल्या काळजाची घालमेल होते. अंगावर काटा उभा राहतो. या लढाईत ते तीन भाबडे जीव वाचले की नाही याची चुटपूट कायमची मनात घर करून राहते.  सध्याची जी आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, नेपाळमध्ये महापूराने 469 जणांचा मृत्यू झाला. तर शेकडो जण बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

Follow Us
मुंबई महापौरपदाचा फॉर्म्युला काय? शिंदे गटाला अडीच वर्षांची संधी?
मुंबई महापौरपदाचा फॉर्म्युला काय? शिंदे गटाला अडीच वर्षांची संधी?
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी;
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी; स्वामींना बांधणार राखी
ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
MNS On Marathi Sakti | ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरे...
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरेंच्या बहिणीसोबतचे खास फोटो समोर
दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
Disha Salian Case Update | दिशा सालियान प्रकरणी सुनावणी; कोर्टात काय घडलं?
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्
मुंडे बंधू-भगिनींसह अदिती तटकरेंनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव; पहा व्हिडीओ
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन