AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू सुंदर परीसारखी दिसतेस.. म्हणत डिलीव्हरी बॉयचं अश्लील वर्तन, IIM कँपस हादरलं

अहमदाबादच्या IIM च्या कँपसमध्ये विद्यार्थिनीला हादरवणार अनउभव आला, फूड डिलीव्हरी देण्यासाठी आलेल्या इसमाने तिला पाहून अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे, पोलिसांनी अथक तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

तू सुंदर परीसारखी दिसतेस.. म्हणत डिलीव्हरी बॉयचं अश्लील वर्तन, IIM कँपस हादरलं
| Updated on: Aug 28, 2026 | 9:49 PM
Share

अहमदाबादच्या वस्त्रापुर या पॉश भागात IIM चं कँपस आहे, मात्र तिथल्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणावर आला आहे. तेथील हॉस्टेलमध्ये राहून MBA चं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला अतिशय भयानक अनुभव आला. ऑनलाइन फूड डिलीव्हरी ॲपच्या डिलीव्हरी बॉयने तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. त्या विद्यार्थिनीने ऑनलाइन ॲपवरून जेवण मागवलं होतं, मात्र त्याची डिलीव्हर देण्यासाठी आलेल्या मुलाने तिच्यासमोर अश्लील भाषेत टिपण्णी केली आणि घाणेरडे इशारेही केले, असा आरोप आहे. या प्रकारामुळे ती विद्यार्थिनी खूप घाबरली मात्र तिने कशीबशी हिंमत गोळा करत वस्त्रापुर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी कसून तपास करत वेगाने कारवाई करून आरोपीला बेड्या ठोकल्या. मात्र या प्रकारामुळे प्रचंड खळबळ माजली .

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी गेल्या पाच महिन्यांपासून अंधजन मंडळाजवळील नवीन IIM कॅम्पसमध्ये राहून शिक्षण घेत्ये. 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7च्या सुमारास ती तिच्या खोलीत होती. तिने ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲपवरून एका रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर केलं होतं. ॲपवर डिलिव्हरी बॉयचे नाव निपम असं दाखवण्यात आलं. रात्री 8 च्या सुमारास त्या विद्यार्थिनीला अनोळखी नंबरवरून फोन आला, पण तिने तो कॉल उचलला नाही. काही वेळाने त्याच क्रमांकावरून पुन्हा फोन आल्यानंतर हा कॉल जेवणाच्या ऑर्डरशी बद्दल असावा, असं समजून तिने फोन उचलला.

मी डिलिव्हरी बॉय आहे, जेवण घेऊन दुसऱ्या मजल्यावर आलोय असं म्हणत फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याची ओळख सांगितली. तेव्हा त्याने त्या विद्यार्थिनीला वर येण्यास सांगितलं. मात्र, तू पहिल्या मजवल्यावर ये, असं ती विद्यार्थिनी त्याला म्हणाली. त्यानुसार ती जेवण घेण्यासाठी पहिल्या मजल्यावर गेली. तेथे जिन्याजवळ डिलिव्हरी बॉय निपम ठक्कर उभा होता.

विद्यार्थिनीचा गंभीर आरोप

तक्रारीनुसार, ती विद्यार्थिनी तिथे पोहोचताच, तिला पाहताच आरोपीने तिच्याबद्दल वाईट टिप्पणी केली. तू परीसारखी दिसतेस, असं तो म्हणाला. मात्र विद्यार्थिनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिची ऑर्डर घेण्यासाठी ती पुढे गेली. यानंतर ती डिलिव्हरी बॉयला OTP सांगत असतानाच त्याने खाद्यपदार्थाच्या पार्सलच्या आडून अश्लील कृत्य केलं, असा आरोप तिने केला.

आरोपीच्या पँटची झिप उघडी होती असं विद्यार्थिनीच्या लक्षात आलं. एवढंच नव्हे तर त्याने तिच्यासमोर अश्लील हावभाव केले, असाही आरोप आहे. या सगळ्या प्रकारामुळे ती हादरली आणि प्रचंड घाबरली. तिने विरोध दर्शवल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. त्यानंतर विद्यार्थिनी कसंबसं जेवण घेतलं आणि ती रुममध्ये परतली. खोलीत पोहोचल्यानंतर तिने तिच्या मैत्रिणीला फोन लावला आणि सगळा प्रसंग सांगितला. ते कळताच त्या विद्यार्थिनीचे काही मित्र-मैत्रीणी तिच्या खोलीवर पोहोचले. त्यानंतर ही घटना IIM प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली विद्यार्थिनीने संस्थेच्या अंतर्गत तक्रार समितीच्या (ICC) सदस्यासह आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत वस्त्रापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

याची गंभीर दखल घेतेल पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि वेगाने तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी मोबाईल क्रमांक तसेच फूड डिलिव्हरीशी संबंधित माहितीच्या आधारे तांत्रिक तपास केला. अहमदाबादमधील वाडज परिसरात राहणाऱ्या डिलिव्हरी बॉय निपम ठक्कर याचा शोध घेत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान