चार मजली इमारत कोसळली, चौघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Delhi Building Collapses: इमारत कोसळल्याची माहिती मिळताच श्वान पथक, पोलीस आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली. तसेच एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन सेवा लोकांना ढिगाऱ्या खालून वाचवण्यासाठी काम करत आहेत.

चार मजली इमारत कोसळली, चौघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
building collapsed
| Updated on: Apr 19, 2025 | 7:34 AM

Delhi Building Collapses: नवी दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात मोठी दुर्घटना घडली. शनिवारी पहाटे एक चार मजली इमारत कोसळली. त्यात चार जणांचा मृत्यू झाला. तसेच दहापेक्षा जास्त जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ टीम आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. इमारत कशी कोसळली, याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. परंतु रात्री झालेल्या पावसाचा परिणाम झाल्याची शक्यता आहे.

बचाव व मदतकार्य सुरु

विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी सांगितले की, इमारत कोसळल्याबद्दल पहाटे २:५० वाजता माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि पाहिले की संपूर्ण इमारत कोसळली होती. लोक ढिगाऱ्याखाली दाबले गेले होते. एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन सेवा लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत ८ ते १० जणांना वाचवण्यात आले आहे.

घटनास्थळी श्वान पथक

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच श्वान पथक, पोलीस आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली. तसेच एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन सेवा लोकांना ढिगाऱ्या खालून वाचवण्यासाठी काम करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली असलेल्या ४ जणांचा मृत्यू झाला. बचाव कार्य अजूनही सुरू आहे. घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, इमारत कोसळली त्या ठिकाणी दोन पुरुष आणि महिला राहतात. मोठ्या महिलेला तीन मुले आहेत, दुसऱ्या महिलेलाही तीन मुले आहेत. आम्हाला सध्या काहीही माहिती नाही. ते कुठेही दिसत नाहीत.

शुक्रवारी दिल्लीतील हवामान अचानक बदलले. रात्री मुसळधार पाऊस आणि वादळ आले. त्यामुळे शहराच्या अनेक भागांवर परिणाम झाला. त्यामुळेही इमारत कोसळल्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीतील मधु विहारमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत पडली होी. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले होते.