AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Security Breach in Loksabha : संसदेत गोंधळ घालणाऱ्या दोन व्यक्ती अटकेत; एकाचं आहे थेट महाराष्ट्र कनेक्शन

संसदेचं कामकाज सुरु असताना अचानक गोंधळ झाला. दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. त्यानंतर एकच गोंधळ पाहायला मिळाला. संसदेत घालणाऱ्या दोन व्यक्ती अटक करण्यात आली आहे. यात एकाचं आहे थेट महाराष्ट्र कनेक्शन... ही व्यक्ती महाराष्ट्रातील आहे. वाचा सविस्तर...

Security Breach in Loksabha : संसदेत गोंधळ घालणाऱ्या दोन व्यक्ती अटकेत; एकाचं आहे थेट महाराष्ट्र कनेक्शन
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 13, 2023 | 3:00 PM
Share

संदिप राजगोळकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 13 डिसेंबर 2023 : लोकसभेचं कामकाज सुरु असताना अचानक गोंधळ झाला. या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे. एका महिलेला आणि महाराष्ट्रातील एका तरूणाला अटक झाली आहे. अमोल शिंदे असं या तरूणाचं नाव आहे. अमोल लातूरमधील झरे गावचा आहे. तर हरियाणातील महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे. नीलम कौर सिंह असं या अटकेत असलेल्या महिलेचं नाव आहे. हरियाणातील हिसार शहरातील ही महिला आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

अमोल शिंदे कोण आहे?

संसदेत गोंधळ घालणारा तरूण अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील आहे. अमोल लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्याच्या झरी गावचा रहिवासी आहे. त्याचे आई-वडील शेतमजूर आहेत. अमोल सध्या कॉलेजमध्ये शिकतो आहे.अमोल जेव्हापासून कॉलेजमध्ये जातोय. तेव्हापासून तो घरी आलेला नाही. अमोलविषयीची ही माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.

संसदेत नेमकं काय झालं?

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज सकाळी संसदेचं कामकाज सुरु झालं. आजच्याच दिवशी 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाला होता. सकाळी कामकाज सुरु होताच या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. पुढे काहीच वेळात संसदेत गोंधळ पाहायला मिळाला. संसदेबाहेर आधी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर दोघेजण संसदेच्या आत गेले. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत जात या दोघांनी गोंधळ घातला.

संसदेचं कामकाज सुरु असताना दोन अज्ञात व्यक्तींनी लोकसभेत उडी घेतली. प्रेक्षक गॅलरीतून अज्ञातांनी लोकसभेत उडी मारली. यावेळी त्यांच्याकडे स्मोक कँडल होती. अज्ञातांनी स्मोक कँडल वापरल्याने मंत्री आणि खासदारांचा गोंधळ उडाला. त्यानंतर सगळे खासदार सभागृहाबाहेर पडले.

गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक

संसदेत गोंधळ झाल्यानंतर आता महत्वाची बैठक होणार आहे. संध्याकाळी चार वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे. सर्वपक्षीय नेत्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आज झालेली घटना आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी