AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG नियमांमध्ये मोठा बदल, आता PNG कनेक्शन घेतल्यावर… नवे अपडेट काय ?

केंद्र सरकारने एलपीजी पुरवठा नियमांमध्ये बदल करत घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा दिला आहे. आता पीएनजी कनेक्शन घेतल्यानंतर एलपीजी कनेक्शन परत (सरेंडर) करणे बंधनकारक नाही. ग्राहकांना ट्रान्सफर वाउचरचा पर्याय मिळेल, ज्यामुळे स्थलांतरित कुटुंबांना, विद्यार्थ्यांना आणि भाडेकरूंना भविष्यात एलपीजी कनेक्शन सहज सुरू करता येईल. यामुळे वाढत्या महागाईत ग्राहकांना सोय आणि आर्थिक ताळमेळ साधण्यास मदत होईल.

LPG नियमांमध्ये मोठा बदल, आता PNG कनेक्शन घेतल्यावर... नवे अपडेट काय ?
LPG नियमांमध्ये मोठा बदलImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 26, 2026 | 10:12 AM
Share

इंधनाचा तुटवडा,वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे, घरगुती गॅस, सगळ्यांचेच वाढलेले दर, यामुळे देशातील सर्वसामान्य जनता अक्षरश: त्रस्त झालीये, वैतागली आहे. वाढत्या महागाईचा खिशावर तर परिणाम होणार आहेच, पण बजेटही कोलमडणार आहे, त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसवायचा कसा, असा प्रश्न जनतेला पडला आहे. मात्र याच दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. घरगुती एलपीजी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एलपीजी पुरवठा आणि वितरण नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.

केंद्र सरकारने 25 मे 2026ला ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गैस (रेग्युलेशन ऑफ सप्लाय अँड डिस्ट्रीब्यूशन) सुधारणा आदेश, 2026 ” अधिसूचित केला. ज्या ग्राहकांनी पीएनजी कनेक्शन स्वीकारले आहे, त्यांना अधिक सोयीसुविधा देणे हा या सुधारणेचा उद्देश आहे.  या नवीन नियमांनुसार, पीएनजी (PNG) कनेक्शन घेतल्यानंतर ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन कायमचे परत (सरंडर) करण्यास भाग पाडलं जाणार नाही.

खरं तर, मध्य पूर्वेत घोंगावणाऱ्या संकटामुळे एलपीजी सिलिंडरसाठी लागणारं वेटिंग, तो कालावधी कमी करण्यासाठी, पीएनजी कनेक्शन घेण्याचा सल्ला सरकारकडून सातत्याने लोकांना देण्यात येत आहे.  अलीकडेच, सरकारने पीएनजी कनेक्शनसाठीच्या अर्जांवर सात दिवसांच्या आत प्रक्रिया करण्याचे निर्देश जारी केले होते. आता त्याचसोबत  पीएनजी कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्यांना अतिरिक्त सुविधा देण्याची योजना सरकार आखत आहे.

LPG नियमांमध्ये मोठा बदल

आता, नवीन नियमांनुसार, एलपीजीचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडे दोन पर्याय असतील. पहिला पर्याय म्हणजे, जर एखाद्या ग्राहकाने पीएनजी कनेक्शन घेतले असेल, तर ते 30 दिवसांच्या आत आपले एलपीजी कनेक्शन बंद करण्यासाठी अर्ज करू शकतात. तर दुसरा पर्याय म्हणजे, भविष्यात आपलं एलपीजी कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहक हे ट्रान्सफर व्हाउचर मिळवू शकतात.

जे लोक रोजगार, शिक्षण किंवा इतर कारणांसाठी वारंवार अशा भागांमध्ये स्थलांतरित होतात, जिथे पीएनजी सेवा उपलब्ध नसते, त्यांच्यासाठी हे ट्रान्सफर व्हाउचर अतिशय फायदेशीर ठरू शकतं.   त्यामुळे भविष्यात जर एखादा ग्राहक पीएनजी कनेक्शन नसलेल्या भागात राहायला गेला,  तर त्यांना त्यांचं एलपीजी कनेक्शन सहजपणे पुन्हा सुरू करू शकता येईल. सतत बदली होईल असा जॉब, स्थलांतरित कुटुंबं, भाडेकरू, विद्यार्थी आणि वेळोवेळी शहरे बदलणाऱ्या कुटुंबांसाठी ही नवी व्यवस्था खूप फायदेशीर ठरू शकते.

सरकारच्या म्हणण्यानुसार, या सुधारणेमुळे ग्राहकांना अधिक सोय मिळेल, तसेच वारंवार नवीन एलपीजी कनेक्शन घेण्याची समस्या दूर होईल आणि पीएनजी व एलपीजी सेवांमध्ये उत्तम समन्वय साधण्यासही मदत होऊ शकते.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल