नवीन पॉप्युलेशन पॉलिसी! दोन पेक्षा जास्त मुले असल्यास निवडणूक लढवता येणार
New Population Policy Rules: 2036 पर्यंत देशात 12% पेक्षा जास्त वृद्ध असणार आहे, असे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोषच्या (UNFPA) अहवालात म्हटले आहे. इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 नुसार 2011 भारतीय लोकसंख्येचे सरासरी वय 24 होते. सध्या ते 29 झाले आहे.
New Population Policy Rules: जगात भारत लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जनसंख्या नियंत्रण धोरणाचा अवलंबन केले जात होते. परंतु आता देशात वृद्धांची वाढत जाणारी संख्या आणि युवकांची कमी होत असलेल्या संख्येमुळे चिंता होऊ लागली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी जाहीरपणे ही चिंता व्यक्त करत नवीन लोकसंख्या धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात युवकांची संख्या वाढवण्यासाठी दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या परिवाराला प्रोत्साहन दिले जाणार आहे. नवीन कायद्यात दोन पेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना निवडणूक लढवता येणार आहे.
प्रचनन दरात घट
चंद्रबाबू नायडू म्हणाले, दक्षिण भारतात ज्येष्ठांची संख्या वाढत आहेत. जपान, चीन आणि काही युरोपीय देश या समस्येचा सामना करत आहेत. या ठिकाणी जनसंख्येचा एक मोठा भाग ज्येष्ठ व्यक्ती आहे. तसेच चांगल्या संधी मिळत असल्यामुळे युवक विदेशात जात आहेत. दक्षिण भारतात हे आव्हान अधिक आहे. आंध्र प्रदेशातील अनेक गावात वृद्ध व्यक्तीच राहिल्या आहेत. युवा पिढी शहरात गेली आहे. दक्षिण भारतातील प्रजनन दर 1.6 टक्के खाली आले आहे. राष्ट्रीय प्रजनन दर 2.1 आहे. जर प्रजनन दरात अशीच घट होत राहिली तर 2047 पर्यंत वृद्धांची संख्या लक्षणीय होणार आहे.
देशात वृद्धांची संख्या वाढली
भारतात वृद्धांची संख्या वाढत असल्याचे केंद्राचे यूथ इन इंडिया-2022 रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्या अहवालानुसार 2036 पर्यंत देशातील 34.55 कोटी लोकसंख्या युवा असणार आहे. ती सध्या 47% पेक्षा जास्त आहे. सध्या देशात 25 कोटी युवक 15 ते 25 वर्षांचे आहे. परंतु पुढील 15 वर्षांत त्यात लक्षणीय घट होणार आहे.
2036 पर्यंत देशात 12% पेक्षा जास्त वृद्ध असणार आहे, असे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोषच्या (UNFPA) अहवालात म्हटले आहे. इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 नुसार 2011 भारतीय लोकसंख्येचे सरासरी वय 24 होते. सध्या ते 29 झाले आहे.