वरमाळा गळ्यात पडल्यानंतर काही मिनिटांत लग्न मोडलं; नव्या नवरीने सांगितलं धक्कादायक कारण

shocking : गळ्यात वरमाळा पडल्यानंतर नवरीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. नवरीने क्षुल्लक कारण सांगून लग्न मोडलं.

वरमाळा गळ्यात पडल्यानंतर काही मिनिटांत लग्न मोडलं; नव्या नवरीने सांगितलं धक्कादायक कारण
| Updated on: Jun 27, 2026 | 2:51 PM

उत्तर प्रदेशच्या औरेया भागातून धक्कादायक घटना समोर आली आहे. गळ्यात वरमाळा पडल्यानंतर नवरीने नवरा अंगाने बारीक असल्याचे सांगून लग्नाला नकार दिला. लग्नसोहळ्यात नवरीने अचानक तडकाफडकी निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ग्राम पंचायतीने नवरीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही नवरीने सासरी जाण्यास नकार दिला. या घटनेची गावात जोरदार चर्चा होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इटावा भागातील अछल्दा गावात ही घटना घडली. नवऱ्याची वरात मोठ्या उत्साहात लग्नमंडपात पोहोचली. त्यानंतर लग्नमंडपात विवाह सोहळा पडला. नवरा-नवरीने एकमेकांच्या गळयात वरमाळा घातल्या. त्याचवेळी नवरीच्या भावाने नवऱ्याच्या गालाचा चिमटा काढला. यामुळे नवऱ्याला राग आला. त्यानंतर नवरा मुलगा मेहुण्यावर ओरडला. पुढील काही क्षणात दोघांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या वादामुळे मंडपातील वातावरण चांगलंच तापलं.

वादानंतर नवरीने लग्न करण्यास नकार दिला. नवरा मुलगा अंगाने बारीक आहे, त्याचासोबत सासरी जायचं नाही, असं नवरीने ठरवलं. ग्राम पंचायतीने दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आलं नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नवरीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनाही यश आले नाही. वादानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वातावरण शांत केलं. या प्रकरणी पोलिसांनी कोणतही कायदेशीर कारवाई केली नाही. तत्पूर्वी, गळ्यात वरमाळा पडल्यानंतर झालेल्या वादामुळे नवरी मंडपातून गायब झाली. बराच वेळ शोधल्यानंतरही नवरी सापडली नाही. त्यामुळे लग्नसोहळा पूर्ण झाला नाही. नवऱ्याकडील मंडळी नवरीला न घेताच घरी परतले.

नेमकं काय घडलं?

नवऱ्याची वरात गुरुवारी रात्री मोठ्या उत्साहात गावात पोहोचली. त्यानंतर गावात पाहुण्यांचं स्वागत झालं. लग्नसोहळा सुरू झाल्यानंतर जोडप्याने एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या. त्यानंतर नवरा-नवरीचे फोटो काढून झाले. परंतु या सोहळ्यात झालेल्या एका वादानंतर नवरी एका खोलीत गेली. त्यावेळी पाहुणे मंडळी जेवण करत होते. काही वेळानंतर सोहळ्याचा पुढील विधी करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नवरीची शोधाशोध सुरू झाली. सर्वत्र शोधल्यानंतरही नवरी सापडली नाही. नवरी गायब झाल्याचे कळताच मंडपातील पाहुण्यांमध्ये खळबळ उडाली. नवरीच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली. काही वेळानंतर नवरी सापडली. परंतु तिने लग्नास नकार दिला. पोलिसांत प्रकरण पोहोचल्यानंतर लग्न रद्द करण्यात आलं. लग्नसोहळा रद्द झाल्याने नवरदेवाची वरात नवरीविना घरी परतली.

Follow Us