AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 पैसे दिल्याने मरणार नाही, सरकार टॅक्सशिवाय चालणार नाही, UPI शुल्कावर थेट..

यूपीआयबद्दल सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. त्यातच अनेकांनी शुल्क आकारणीला विरोध केला. 100 रूपयांवर फक्त 40 पैसे शुल्क आकारले जात आहे, त्यामुळे काही समस्या नसावी, असे मोठे विधान करण्यात आले.

40 पैसे दिल्याने मरणार नाही, सरकार टॅक्सशिवाय चालणार नाही, UPI शुल्कावर थेट..
UPI charges
| Updated on: Sep 17, 2026 | 11:41 AM
Share

केंद्र सरकारने यूपीआय व्यवहारावर आता शुल्क लागू केले आहे. आता अगोदरसारखे यूपीआय व्यवहार फ्रीमध्ये राहणार नाहीत. यावरून पूर्ण देशात वेगळा मुद्दा उठला आहे. या शुल्काला लोकांकडून विरोध केला जात आहे. काही लोक हे शुल्क चुकीचे असल्याचे सांगून विरोध करत आहेत. यासोबतच अजून एक मोठा धोका असा आहे की, ज्यामुळे पुन्हा एकदा रोख व्यवहार जास्त वाढेल. अधिकचे पैसे मोजण्याऐवजी रोख रक्कमेत लोक व्यवहार करतील. आमच्यावरील दबाव वाढत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. यादरम्यानच निती आयोगाचे वाईस चेअरमन यांचे मोठे विधान आले. निती आयोगाचे वाईस चेअरमन असलेल्या अशोक कुमार लाहिडी यांनी शुल्काचे पूर्ण समर्थन केले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, टॅक्स वसूल केल्याशिवाय कोणतेही सरकार चालू शकत नाही. त्यांनी हे देखील स्पष्ट म्हटले की, सरकार एक शुल्क रक्कम वसूल करत आहे.

ही रक्कम देण्यासाठी कोणालाही काहीही समस्या नसावी. यादरम्यानच त्यांनी स्पष्ट केले की, हे त्यांचे वैयक्तीक मत आहे. निती आयोगाचे हे मत नाही. माझे स्पष्ट मत आहे की, लोकांनी प्रत्येक कामासाठी टॅक्स दिला पाहिजे. त्यांनी पुढे चाणक्य नीतीचे उदाहरण देत म्हटले की, राजाने आपल्या जनतेकडून टॅक्स अशाप्रकारे वसून केला पाहिजे,जश्या मध्यमाशा…

कोणतेही नुकसान न पोहोचता हळू हळू मध गोळा करायचा. त्यांनी पुन्हा पुन्हा म्हटले की, यूपीआयसंदर्भात जे शुल्क आकारण्यात आले, ते अत्यंत कमी आहे. 100 रूपयांच्या व्यवहारावर फक्त 40 पैसे शुल्क आकारले जात आहे. हळू हळू लोकांनाही याची सवय नक्कीच होईल. सरकार अगोदर 15 ऑक्टोंबरला 2000 च्या व्यवहारावर व्यापाऱ्यांना 0.4 टक्के शुल्क आकारेल.

त्यात लोकांना नाही तर व्यापाऱ्यांना ते शुल्क भरावे लागेल. यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की, कोणतेही सरकार टॅक्सशिवाय चालू शकत नाही. 100 रूपयांवर 40 पैसे लागणार आहे, ते शुल्क भरायला काही समस्या नसावी, असेही त्यांनी म्हटले. यूपीआयबद्दल सरकारकडून कडक भूमिका घेतली जात आहे.

Follow Us
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा