नितीश-तेजस्वी मंत्रिमंडळाचा आज शपथविधी, 31 मंत्री घेणार शपथ, कोणाच्या खात्यात किती मंत्रीपदे?

बिहारमधील महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला आता निश्चित करण्यात आला आहे. नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि भक्तचरण दास यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीनंतर मंत्र्यांची यादी राज्यपालांना सादर करण्यात आली आहे.

नितीश-तेजस्वी मंत्रिमंडळाचा आज शपथविधी, 31 मंत्री घेणार शपथ, कोणाच्या खात्यात किती मंत्रीपदे?
महादेव कांबळे

|

Aug 16, 2022 | 6:47 AM

मुंबईः बिहारमध्ये नितीश-तेजस्वी सरकारच्या (Nitish-Tejashwi Sarkar) मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार होत आहे. बिहारच्या महाआघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा (Bihar Cabinet expansion) फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर राज्यपाल फागू चौहान मंगळवारी सकाळी 11.30 वाजता मंत्र्यांना शपथ देणार आहेत. मंगळवारी राज्यपाल फागू चौहान (Governor Fagu Chauhan) 31 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. मंगळवारी शपथ घेणार्‍या मंत्र्यांमध्ये आरजेडीचे 15, जेडीयूचे 12, काँग्रेसचे दोन आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचा एक आमदार शपथ घेणार आहे. तर चक्कीचे अपक्ष आमदार सुमित सिंह यांनाही मंत्रीपद देण्यात येणार आहे. सुमित सिंह हे एनडीए सरकारमध्येही मंत्री होते. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे प्रभारी भक्त चरण दास हे काँग्रेसमधील मंत्र्यांची नावं घेऊन तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर तेजस्वी यादव आणि भक्तचरण दास त्याच वाहनाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचले होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला आहे

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तेजस्वी यादव आणि भक्तचरण दास यांनी आरजेडी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी नितीश कुमार यांच्याकडे सोपवली होती. यावेळी तीन नेत्यांच्या बैठकीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार 15 मंत्री शपथ घेणार आहेत त्यापैकी जेडीयूचे 12 मंत्री शपथ आणि काँग्रेसचे 2 आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे 1 आणि 1 अपक्ष आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. शिक्षण, ग्रामीण बांधकाम, आरोग्य, रस्ते बांधकाम विभाग राजदकडे जाण्याची शक्यता आहे तर गृह आणि वित्त जेडीयूकडे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तेज प्रताप मंत्री बनणार आहेत

तेज प्रताप यादव, सुधाकर सिंह, आलोक मेहता हे राजदकडून मंत्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच कुमार सर्वजीत, समीर महासेठ, अनिता देवी, ललित यादव, ऋषी कुमार, सुरेंद्र यादव, चंद्रशेखर, कार्तिक कुमार, शमीम अहमद, रणविजय साहू, अख्तरुल इस्लाम शाहीन यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असून मुन्नी देवी यांचा मंत्रिमंडळातील समावेश हे राजकीयदृष्ट्या आश्चर्यकारक असणार आहे.

उपेंद्र कुशवाह यांनाही संधी?

तर जेडीयूकडून विजय कुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, श्रवण कुमार, संजय झा, अशोक कुमार चौधरी, लेशी सिंह, मदन साहनी, जामा खान, सुनील कुमार, शीला मंडल यांना नितीश-तेजस्वी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. शेवटच्या क्षणी उपेंद्र कुशवाह यांच्या नावाचाही समावेश असू शकतो असंही सांगितले जात आहे.

शकील अहमद खान मंत्री होणार

काँग्रेसकडून मात्र अजून कोणाच्या गळ्यात मंत्रिपद पडणार हे अजूनही स्पष्ट झाले नाही. मात्र मंगळवारी होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमात दोन चेहरे म्हणजेच राजेश कुमार आणि शकील अहमद खान असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. या दोघांची नावं चर्चेत असतानाच मुरारी गौतम आणि अजित शर्मा यांचीही नावं समोर येत असून संतोष सुमन यांना मात्र मंत्रिपद मिळण्याचीच शक्यता आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें