AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मथुरा-वृंदावनच नाही तर रंगांनी न्हाऊन जाल अशी ‘या’ ठिकाणी खेळली जाते अनोखी धुळवड

या वर्षी रंगपंचमी 4 मार्च रोजी साजरी केली जाईल. रंगपंचमीचा हा उत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का की अशीही काही ठिकाणे आहेत जिथे रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. चला कोणती आहेत अशी ठिकाणं ती जाणून घेऊयात.

मथुरा-वृंदावनच नाही तर रंगांनी न्हाऊन जाल अशी 'या' ठिकाणी खेळली जाते अनोखी धुळवड
HoliImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 27, 2026 | 12:14 PM
Share

रंगपंचमीचा हा उत्सव आपण प्रत्येकजण मोठ्या उत्साहात साजरे करतो. पण जेव्हाही आपण या रंगपंचमी सणाबद्दल विचार करतो तेव्हा सर्वात आधी आपल्या मनात मथुरा-वृंदावनची रंगपंचमी आठवते. कारण या ठिकाणी आगळीवेगळी काठ्यांची आणि फुलांनी भरलेली होळी खेळली जाते. राधा-कृष्ण यांच्या पावन भुमित दिसणारा रंगांचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संगम खरोखरच अनोखा आहे. त्यामुळे हे क्षण पाहण्यासाठी लोकं दूरदूरून येतात. काही लोकं दरवर्षी होळी साजरी करण्यासाठी मथुरा येथे आर्वजुन जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की हा रंगपंचमीचा सण केवळ मथुरा आणि वृंदावनमध्येच नाही तर देशाच्या अनेक भागात वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

रंगपंचमी हा सण केवळ रंगांचा सण नाही तर तो हृदयांमधील दरी भरून काढण्याची, भूतकाळातील द्वेष विसरून जाण्याची आणि नात्यांमध्ये नवीन गोडवा जोडण्याची संधी आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या लेखात अशा पाच ठिकाणांबद्दल आपण जाणून घेऊयात.

बरसानाची लाठी होळी

बरसाना येथील रंगपंचमी साजरी करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. जगभरात लाठमार होळी म्हणून ओळखली जाते. तर या ठिकाणी महिला प्रतीकात्मकपणे लाठ्यांनी पुरुषांवर हल्ला करतात, तर पुरुष ढालींनी स्वतःचे रक्षण करतात. ही परंपरा राधा आणि कृष्णाच्या लीलांशी जोडलेली असल्याचे मानले जाते. रंग आणि भक्तीचे हे अनोखे मिश्रण बरसनाची होळी अद्वितीय बनवते.

वाराणसीमध्येही रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने होते साजरी

काशीतील रंगपंचमी ही अध्यात्म आणि मौजमजेचे एक अनोखे मिश्रण आहे. केवळ दिवाळीच नाही तर रंगपंचमी ही खरोखरच नेत्रदीपक आहे. गंगेचे घाट रंग, संगीत, भांग आणि थंडाई यांनी भरलेले असतात. शिवभक्तांची गर्दी, ढोल-ताशांचे गजर आणि घाटांवर गुलालाची उधळण हे सर्व एकत्रितपणे वाराणसीतील रंगपंचमीला खरोखरच खास बनवते.

शांतिनिकेतनची अनोखी रंगपंचमी

पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतनमध्ये रंगपंचमी हा वसंतोत्सव म्हणून साजरा केला जातो. येथे रवींद्रनाथ टागोरांची परंपरा रंगांशी जोडली गेली आहे. विद्यार्थी पिवळे कपडे परिधान करतात आणि गाणी, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे वसंत ऋतू आणि रंगपंचमीचे स्वागत करतात. ही रंगपंचमी आवाजपेक्षा सौंदर्य आणि कलेचे प्रतीक मानली जाते. जर तुम्हाला शांत आणि आरामदायी रंगपंचमी साजरी करायची असेल तर तुम्ही शांतिनिकेतनला भेट देऊ शकता.

उदयपूरची शाही रंगपंचमीही आहे अद्भुत

उदयपूरची रंगपंचमी त्यांच्या राजेशाहीसाठी ओळखली जाते. मेवाड राजघराण्याच्या परंपरेचे पालन करून येथे होलिका दहन आणि भव्य मिरवणुका काढल्या जातात. शाही पोशाख, सजवलेले हत्ती आणि घोडे आणि लोकनृत्य उदयपूरची रंगपंचमी खरोखरच शाही उत्सव बनवते. शाही अनुभवासाठी तुम्ही होळीकरिता उदयपूरला नक्कीच भेट द्यावी.

प्रयागराजमध्ये मोठ्या उत्साहात रंगपंचमी होते साजरी

प्रयागराजमधील संगम शहर देखील एका अनोख्या पद्धतीने रंगपंचमी साजरी करतात. कपडा फाड रंगपंचमी खूप लोकप्रिय सण येथे साजरा केला जातो, जिथे शेजारी शेजारी सामूहिक रंगपंचमी साजरी केली जाते, जिथे पुरुष एकमेकांचे कपडे फाडतात. शिवाय, संगीत आणि एकत्रितपणा यामुळे रंगपंचमीला एक विशेष प्रेम दिलं जातं.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...