POK नाही तर भारत पाकिस्तानच्या या शहरावर करू शकतो पहिला स्ट्राइक, समोर आलं मोठं कारण
पहलगाम हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की समजा भारतानं पाकिस्तानवर हल्ला केलाच तर सर्वात आधी पाकिस्तानचं कोणतं शहर भारताच्या निशाण्यावर असेल?

पहलगाम हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की समजा भारतानं पाकिस्तानवर हल्ला केलाच तर सर्वात आधी पाकिस्तानचं कोणतं शहर भारताच्या निशाण्यावर असेल? सध्या सुरू असलेल्या घडामोडी आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताकडून पहिला हल्ला हा पाकव्याप्त काश्मीर पीओकेवर नाही तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके या शहरावर होऊ शकतो.
मुरीदके हे शहर लष्कर ए तोयबाचं मुख्यालय आहे, याच शहरामधून गेल्या दोन दशकांमध्ये जेवढे दहशतवादी हल्ले झाले त्या हल्ल्याची योजना बनवण्यात आली. मुरीदके हे शहर लाहोर शहराच्या जवळ आहे, हे शहर दहशतवादी संघटना लष्कर ये तोयबाचं मुख्यालय आहे. ‘जमात उल दावा’ असं या मुख्यालयाचं नाव आहे. हे मुख्यालय फक्त दहशतवादी कारवायांचंच केंद्र नाही तर इथेच बसून भारताविरोधात अनेक हल्ल्यांचा कट देखील रचण्यात आला आहे.
एका रिपोर्टनुसार याच शहरामध्ये 26/11, पठाणकोट आणि आताच झालेल्या पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. समोर आलेल्या माहितीनुसार या शहरात लष्कर ए तोयबाचा टॉप लिडर हाफिज सईद,सैफुल्लाह, हाशिम मूसा आणि पाकिस्तानातील लष्कर अधिकाऱ्यांची कायम ये-जा असते. याचा अर्थ हे शहर पाकिस्तानच्या लष्करी कारवायांचा कणा आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी या शहराला टार्गेट केलं जाऊ शकतं, अशी शक्यता आहे.
एनआयएचा रिपोर्ट
एनआयएच्या चौकशीमध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे, पहलगाममध्ये जो 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला, त्याची योजना दोन फेब्रुवारी रोजी पीओकेच्या रावलकोट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीमध्ये बनवण्यात आली होती. या बैठकीला हमाससह विविध दहशतवादी संघटनांचे दहशतवादी उपस्थित होते. त्यामुळे भारतानं जर पाकिस्तानवर हल्ला केला तर तो पीओकेवर न करता मुरीदके या शहरावर होऊ शकतो. या हल्ल्यामुळे दहशतवादी कारवायांना मोठा हादरा बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
