AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभराचा पगार केवळ १ रुपया? एसबीआयचा हा चेक कोणाचा, कळताच सॅल्युट ठोकाल..

जिथे लोक पगारासाठी आंदोलनं करतात, ढोर मेहनत घेतात तेथे एका व्यक्तीला वर्षभराच्या कामाचा मोबदला केवळ १ रुपया मिळत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल...

वर्षभराचा पगार केवळ १ रुपया? एसबीआयचा हा चेक कोणाचा, कळताच सॅल्युट ठोकाल..
| Updated on: Jul 05, 2025 | 9:09 PM
Share

आंत्रप्रेन्योर आणि माइंडट्रीचे ( Mindtree ) को- फाऊंडर सुब्रतो बागची यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे, आणि आपल्या शेवटच्या पगाराचा चेक त्यांनी पोस्ट केला आहे. जेव्हा ते ओदिशा सरकारसोबत इन्स्टिट्यूशन आणि कॅपेसिटी बिल्डींग म्हणून चीफ अडव्हायझर म्हणून काम करीत होते, तेव्हा त्यांना वर्षाला एक रुपया पगार होता. त्यांनी सांगितले की ८ वर्षांचे आठ चेक मिळाले आणि त्यांचा अखेरचा चेक आज देखील त्यांच्यासाठी खास आहे.बागची म्हणाले की असली दौलत पैसा नाही. दुसऱ्यांची सेवा करणे आणि देशासाठी योगदान देणे आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अखेरचा चेक शेअर करत बागची म्हणाले की, ‘या एका जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे आहे जिला मी सोडू शकत नाही ? जरी मी सरकार सोबत केलेल्या कामाचा दरवर्षासाठी एक रुपयांचे मानधन घेतले. तेथील आठ वर्षांसाठी मला आठ चेक मिळाले आणि हा माझा शेवटचा सॅलरी चेक होता.’

बागची यांची हो पोस्ट व्हायरल झाली आणि अनेक लोकांनी यास खऱ्या नेतृत्वाचे एक दुर्लभ उदाहरण असे म्हटले आहे. एका युजरने टिप्पणी करताना लिहीलेय की, “ओदीशासाठी आपले योगदान अद्भूत आहे. तुम्ही कॉर्पोरेट जगतातील ८ वर्षात ८००० कमावू शकला असता. सलाम !”

येथे पोस्ट पाहा –

सोशल मीडियावर लोकांचे हृदय जिंकले

अन्य एका युजरने म्हटले आहे की तुम्ही महान व्यक्ती आहेत. जे देशाबद्दल विचार करताय, न केवल स्वत:च्या विकासाबद्दल . पुढच्या एका युजरने लिहीलंय की तुम्ही केलेल्या महान कामाला शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही.आणि अनेक लोकांसाठी एक जीवंत प्रेरणा आणि मूर्तीमंत उदाहरण आहात.

बागची यांनी साल 2016 मध्ये ओदीशा स्कील डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या चेअरमन पदाचा भार सांभाळाला आहे. ते COVID-19 च्या साथी प्रसंगी ओदीशा सरकारचे मुख्य प्रवक्ते देखील होते.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.