AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्य मंत्र्यांवर गोळ्या झाडणारा पोलीस अधिकारी आहे तरी कोण?

नाबा दास कारमधून उतरताच त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावर गोळ्या घातल्या. त्यामुळे नाबा खाली कोसळले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

आरोग्य मंत्र्यांवर गोळ्या झाडणारा पोलीस अधिकारी आहे तरी कोण?
पोलीस अधिकाऱ्याने केला गोळीबार
| Updated on: Jan 30, 2023 | 7:58 AM
Share

भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असताना हल्ला झाला. नाबा दास कारमधून उतरताच त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावर गोळ्या घातल्या. त्यामुळे नाबा खाली कोसळले. त्यांना एअर अँबुलन्सने भुवनेश्वर येथे नेण्यात आले. प्रचंड सुरक्षा बंदोबस्त असतानाही हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांने केला गोळीबार

ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ त्यांच्यावर एकापाठोपाठ ५ राऊंड गोळीबार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे नबा दास यांच्यावर गोळीबार करणारा दुसरा कोणी नसून पोलीस अधिकारी आहे. ASI गोपाल दास त्याचे नाव आहे. तो झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथील गांधी चौक पोलिस चौकीत तैनात होतो. गोपाल दासने आपल्या रिव्हॉल्वरने नबा दास यांच्यावर गोळीबार केला.

जवळून केला हल्ला

गोपाल दास याने पुर्ण नियोजनातून हा हल्ला केला. त्याने अगदी जवळून गोळी झाडली आहे. या हल्ल्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नबा दास कारमधून खाली उतरताच गोपाल दास याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर सत्ताधारी पक्ष बीजदच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पक्षाचे अनेक कार्यकर्ते आंदोलन करत आहे.

गोळीबार करुन फरार

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एका सार्वजनिक कार्यालयासाठी नबा दास प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या स्वागतासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी जवळून गोळीबार करून एक पोलीस पळून जात असल्याचे लोकांनी पाहिले.

शनी शिंगणापूरला १ कोटींची देणगी

बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते नबा दास महाराष्ट्रातही चर्चेत आले होते. त्यांनी शनी शिंगणापूर मंदिराला एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा सोन्याचा कलश दान केला होता. १.७ किलो सोने आणि ५ किलो चांदीचा हा कलश होता.

सर्वात श्रीमंत मंत्री

नबा दास हे ओडिशा सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे संबलपूर, भुवनेश्वर आणि झारसुगुडा येथील विविध बँकांमध्ये 45 लाख रुपयांहून अधिक ठेवी आहेत. त्यांच्यांकडे सुमारे 15 कोटी रुपयांची 70 हून अधिक वाहने आहेत. ज्यामध्ये 1.14 कोटी किमतीची मर्सिडीज बेंझ देखील समाविष्ट आहे.

विधानसभेतही पॉर्न वादात सापडले होते

2015 मध्ये विधानसभेच्या अधिवेशनात नब किशोर दास पॉर्न पाहताना पकडले गेला होते. यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी यांनी त्यांना आठवडाभरासाठी निलंबित केले होते. त्यावेळी ते म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत एकही अ‍ॅडल्ट व्हिडिओ पाहिला नाही. इंटरनेट वापरत असताना चुकून हा प्रकार घडला. मला कळताच मी त्याच वेळी तो व्हिडिओ थांबवला.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.