AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Odisha Train Accident: माणुसकीची रांग! भीषण रेल्वे अपघातानंतर लोकांच्या लांबच लांब रांगा

Train Accident: रक्तदान करणाऱ्या लोकांव्यतिरिक्त सुमारे 200 रुग्णवाहिकांसह 45 फिरती आरोग्य पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे. मदतीसाठी लोकांची गर्दी होत आहे.

Odisha Train Accident: माणुसकीची रांग! भीषण रेल्वे अपघातानंतर लोकांच्या लांबच लांब रांगा
Odisha train accident balasore
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 03, 2023 | 1:51 PM
Share

बालासोर: ओडिशातील बालासोर जिल्ह्यात तीन रेल्वेगाड्यांमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 280 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, माणुसकीचे उदाहरण देणारे काही खास फोटो समोर आले आहेत, ज्यात जखमींना रक्तदान करण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याशिवाय स्थानिक लोकही मदत आणि बचाव कार्यात टीमसह मदत करत आहेत.

वास्तविक आरोग्य विभागाने रक्तदानासाठी शिबिराचे आयोजन केले असून तिथे लोक रक्तदान करत आहेत. या बचावकार्यात स्थानिक लोकांची मोलाची मदत होत आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासह अनेक कामांमध्ये ते सहकार्य करत आहेत. जखमींच्या उपचारासाठी रक्ताची मागणी अचानक वाढली आणि सर्व युनिट रक्ताची गरज भासू लागली. या पार्श्वभूमीवर लोकांनी माणुसकीचे उदाहरण सादर केले आहे. रक्तदान करण्यासाठी लोक स्वत:हून रुग्णालयात पोहोचत आहेत.

काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात परिस्थिती अशी दिसत आहे की रुग्णालयांमध्ये रक्तदात्यांच्या रांगा लागल्या आहेत. बालासोरमध्ये एका रात्रीत 500 युनिट रक्त गोळा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एका मीडिया रिपोर्टनुसार, तरुणाईची गर्दी दिसतेय आणि लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतायत. कोणी 2 तास उभे राहिले, तर कोणी 4 तास उभे राहिले. वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान करण्यासाठी आलेले हे तरुण आहेत.

कोलकात्यापासून 250  किमी दक्षिणेला आणि भुवनेश्वरपासून 170 किमी उत्तरेला बालासोर जिल्ह्यातील बहानागा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेनंतर एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील जखमींना रेल्वेने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...