AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांच्या बँक खात्यात येणार 5000 रुपये, या सरकारने सुरु केली योजना

PM Narendra Modi 74th Birthday :सुभद्रा योजनेच्या पात्र महिला ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जासाठी त्यांना सुभद्रा पोर्टलचा वापर करावा लागेल. तर ऑफलाइन अर्जासाठी ते स्थानिक बँका, पोस्ट ऑफिस आणि सामान्य सेवा केंद्रांमध्ये जाऊन या योजनेसाठी नोंदणी करू शकतात.

महिलांच्या बँक खात्यात येणार 5000 रुपये, या सरकारने सुरु केली योजना
subhadra yojana
| Updated on: Sep 19, 2024 | 10:30 AM
Share

PM Narendra Modi 74th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्याचे औचित्य साधून महिलांसाठी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेत महिल्यांच्या खात्यात पाच हजार रुपये येणार आहे. वर्षभरात एकूण दहा हजार रुपये महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेचे नाव सुभद्रा योजना आहे. ओडिशा सरकारने ही योजना आणली आहे.

काय आहे योजना

सुभद्रा योजना (Subhadra Yojna) ओडिशा सरकारची योजना आहे. या योजनेत राज्यातील 21 ते 60 वर्ष वय असलेल्या महिलांना दरवर्षी 10,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या योजनेची सुरुवात केली. योजनेला नाव भगवान जगन्नाथ यांची बहीण देवी सुभद्रा यांच्या नावावरुन दिले आहे.

दोन टप्प्यात मिळणार 10,000 रुपये

ओडिशा सरकार राज्यातील महिलांच्या खात्यात दोन टप्प्यात 10 हजार रुपये देणार आहे. ही योजना पाच वर्षांसाठी म्हणेज 2028-29 पर्यंत असणार आहे. योजनेचा एक हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनी तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी दिला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 55,825 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या पैशांच्या माध्यमातून महिला आपला व्यवसाय सुरु करु शकतात.

कोण ठरणार पात्र

  • महिला मूळची ओडिशा राज्याची रहिवाशी असावी.
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) किंवा राज्य अन्न सुरक्षा योजना (SFSS) मध्ये या महिलेचे नाव शिधापत्रिकेत असावे.
  • एकूण कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे वय 21-60 वर्षे असावे.

कसा करावा अर्ज

सुभद्रा योजनेच्या पात्र महिला ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जासाठी त्यांना सुभद्रा पोर्टलचा वापर करावा लागेल. तर ऑफलाइन अर्जासाठी ते स्थानिक बँका, पोस्ट ऑफिस आणि सामान्य सेवा केंद्रांमध्ये जाऊन या योजनेसाठी नोंदणी करू शकतात.

कोणती कागदपत्रे लागतील

  • आधार कार्ड – ओळख पडताळणीसाठी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जन्म प्रमाणपत्र – अर्जदाराच्या वयाची पुष्टी करण्यासाठी
  • बँक खाते तपशील – पैसे हस्तांतरित करण्यासाठी.
  • पत्त्याचा पुरावा – ओडिशातील अर्जदाराच्या निवासस्थानाची पुष्टी करण्यासाठी.
  • जात प्रमाणपत्र – लागू असल्यास, सामाजिक श्रेणीचे तपशील प्रदान करण्यासाठी.
  • रहिवासी पुरावा – ओडिशातील निवासाची पडताळणी करण्यासाठी
  • मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.