Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका स्टेटमेंटने जगात खळबळ, भारताचही होणार मोठं नुकसान!

Donald Trump : मध्यपूर्वेत इस्रायल-इराणमध्ये भीषण युद्ध सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्याने जगाच टेन्शन वाढलं आहे. भारताला सुद्धा मोठा फटका बसेल. बाजारात अनिश्चितता वाढली आहे. सोबतच अमेरिकी वायदा बाजारात सुद्धा घसरण पहायला मिळाली.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका स्टेटमेंटने जगात खळबळ, भारताचही होणार मोठं नुकसान!
| Updated on: Jun 17, 2025 | 9:34 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने जागतिक बाजारात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी तेहरान रिकामी करायला सांगितलं आहे. त्यामुळे मंगळवारी आशियाई बाजारात सुरुवातीच्या सत्रात तेलाच्या किंमतीत 2 टक्के वाढ पहायला मिळाली. या वक्तव्याने इस्रायल-इराण तणाव कमी होण्याच्या शक्यतेला झटका बसला आहे. त्यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे. सोबतच अमेरिकी वायदा बाजारात सुद्धा घसरण पहायला मिळाली. ट्रम्प यांच्या या वक्तव्याचा भारतावर सुद्धा परिणाम होईल. कारण तेलाचे दर वाढले तर भारताला सुद्धा मोठं नुकसान सोसावं लागेल.

ट्रम्प यांनी अल्बर्टा येथे आयोजित जी-7 शिखर सम्मेलनादरम्यान सोशल मीडिया पोस्टमध्ये तेहरानसंबंधी हे म्हटलं आहे. त्यांचा इशारा कुठल्याबाजूला आहे ते अजून स्पष्ट नाहीय. याआधी ट्रम्प म्हणालेले की, इराणला तडजोड करायची आहे. पण त्यांच्या ताज्या वक्तव्याने तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेलाच्या किंमतीमध्ये झालेल्या या वाढीचा परिणाम भारतासारख्या देशांवर सुद्धा होणार आहे. कारण भारताला आपली गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तेल आयात करावं लागतं. एक्सपर्टनुसार, तेलाच्या किंमती वाढत राहिल्या तर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील. त्यामुळे महागाई आणि वाहतुकीचा खर्च वाढेल. त्याचा फटका सर्वसामान्य माणसाच्या खिशाला बसेल. परिणामी अर्थव्यवस्थेवर सुद्धा नकारात्मक प्रभाव पडेल.


भारताची चिंता वाढवली

वॉल स्ट्रीट जर्नलच्या एकारिपोर्टनुसार, तेहरानने इस्रायलसोबत तणाव कमी करण्याचे संकेत दिलेत. अमेरिकेसोबत अणवस्त्र चर्चा पुन्हा सुरु करण्यास तयार आहे. फक्त एकच अट आहे, अमेरिकेने इस्रायलला हल्ल्यामध्ये मदत करु नये. रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये सुद्धाच हेच म्हटलं आहे. इराणने कतर, सौदी अरेबिया आणि ओमानच्या माध्यमातून हाच संदेश पाठवला आहे. विश्लेषकांनुसार, इस्रायल-इराणध्ये तणाव मर्यादीत राहिला, तर बाजारावर याचा जास्त परिणाम होणार नाही. पण ट्रम्प यांचं वक्तव्य आणि तेलाच्या वाढत्या किंमतींनी भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशाची चिंता वाढवली आहे.