दोन दिवसातच विवाह बेकायदेशीर? उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान विरोधात फतवा जारी, मौलवी आक्रमक

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि पत्रकार निधी राजदान यांच्या विवाहावर मौलवींनी फतवा जारी केला आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी यांनी हा विवाह इस्लाम नियमांनुसार बेकायदेशीर ठरवला आहे, कारण निधी राजदान गैर-मुस्लिम आहेत. या फतव्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून, उमर अब्दुल्ला यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागले आहे.

दोन दिवसातच विवाह बेकायदेशीर? उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान विरोधात फतवा जारी, मौलवी आक्रमक
Omar Abdullah-Nidhi Razdan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 10:30 AM

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पत्रकार निधी राजदान यांच्यासोबत विवाह केला आहे. या दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी यांनी मात्र हा विवाह बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. मौलाना रजवी यांनी मुख्यमंत्री अब्दुल्ला यांच्याविरोधात फतवा जारी केला आहे. इस्लाममध्ये लग्नाबाबतचे काही नियम घालून दिलेले आहेत, याकडेही या फतव्यात लक्ष वेधण्यात आलं आहे. त्यामुळे यावर आता उमर अब्दुल्ला काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इस्लाममध्ये लग्नासाठी मुलगा आणि मुलगी दोन्ही मुस्लिम असायला हवेत. जर या पैकी कोणी मुस्लिम नसेल तर तो विवाह कायदेशीर मानला जात नाही. या ठिकाणी उमर अब्दुल्ला मुस्लिम आहेत आणि निधी राजदान गैर मुस्लिम आहे. दोघांनी लग्न केलं आहे. त्यामुळे इस्लामच्या नियम आणि परंपरेनुसार हा विवाह बेकायदेशीर ठरतो, असं मौलवी रजवी यांनी म्हटलं आहे.

Loading...

आधी इस्लाम स्वीकारायला हवा होता

निधी राजदान यांना आधी इस्लाम स्वीकारायला लावायला हवा होता. त्यांना कलमा पढवायला लावायला हवा होता. त्यानंतर दोघांनी लग्न केलं पाहिजे होतं. तेव्हा हे लग्न कायदेशीर ठरलं असतं. पण उमर अब्दुल्ला यांनी तसं काही केलं नाही. त्यामुळे हा विवाह बेकायदेशीर असल्याचं रजवी यांनी म्हटलं आहे.

सीएमने दिली लग्नाची बातमी

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दोन दिवसांपूर्वी एक ट्विट करून निधी राजदानसोबत विवाह केल्याचं सांगितलं होतं. दोघांचे फोटो एक्सवर शेअर करून काल नव्या प्रवासाला सुरुवात केली, असं त्यांनी म्हटलं होतं. पत्रकार निधी राजदान यांनीही एक्सवरून उमर यांच्याशी लग्न केल्याची पुष्टी केली होती. या लग्नाला दोन्ही कुटुंबातील लोक आणि काही खास जवळचे लोकच उपस्थित होते. दुसरं लग्न करण्यापूर्वी दोघांनीही आपल्या आधीच्या जीवनसाथीला तलाक दिला होता. लग्नानंतर दिल्लीत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला ठरावीक लोकांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, आता या लग्नाच्या निमित्ताने नवीन वाद निर्माण झाल्याने उमर अब्दुल्ला यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यावर आता अब्दुल्ला काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us