
बिहारमध्ये सध्या धक्कादायक प्रकार सुरू आहे. राज्याच्या काही भागातील मजुरांचा बँक खात्यात अचानक मोठी रक्कम जमा होत आहे. बँक खात्यामध्ये हजारो करडो रुपये जमा होत आहेत. ज्या बँक खात्यामध्ये दरवेळी दहा हजार रुपये देखील नसतात. मात्र अचानक एकाचवेळी हजारो करडो रुपये जमा झाल्यामुळे या मजुरांच्या अडचणी वाढत आहेत. बिहारमधील जमुई येथील एका मजुराच्या बँक खात्यात नुकतेच तब्बल एक हजार करोड रुपये जमा झाले होते, त्यामुळे या मजुराला प्रचंड धक्क बसला होता, आता ही घटना ताजी असतानाच असाच एक प्रकार मुझफ्फरपूरमधून समोर आला आहे. जिल्ह्यातल्या मरवनमध्ये राहाणाऱ्या एका सामान्य मजुराच्या बँक खात्यामध्ये अचानक पणे कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. बँक प्रशासनाला याची माहिती मिळताच या मजुराचं बँक अकाउंट गोठवण्यात आलं, मात्र बँक खातं गोठवल्यामुळे आता या मजुराच्या अडचणीत वाढ झाली आहे, या घटनेची माहिती मिळताच सायबर सेलनं देखील तपास सुरू केला आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूर जिल्ह्यातल्या मरवन तालुक्यातील झखरा गावात राहणऱ्या एका मजुराच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. झूमन यादव असं या मजुराचं नाव आहे, तो सध्या मुंबईमधील एका हॉटेलमध्ये काम करतो. त्याचं कोटक महिंद्र बँकेत खातं आहे, एक दिवस त्याच्या खात्यामध्ये एवढा पैसा जमा झाला की त्यालाच काय बँक अधिकाऱ्याला सुद्धा मोजनं कठीण बनलं. पैसे जमा झाल्यानंतर या व्यक्तीच्या खात्यामधील बॅलन्स 10,01,35,60,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,02,945 इतकं होतं. एकावर 36 शु्न्यापेक्षाही अधिक पैसे या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा झाले होते. ही रक्कम लाखो करडोच्या घरात होती.
आचानक बँक खात्यामध्ये एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचं पाहून झूमन यादव आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना धक्काच बसला, एका सामान्य मजुराच्या खात्यामध्ये एवढे पैसे कुठून आले? असा प्रश्न त्यांना पडला. हे पैसे जमा झाले त्यापूर्वी त्याच्या खात्यामध्ये फक्त दोन ते तीन हजार रुपयेच होते, मात्र त्यानंतर अचानक खरबो रुपये त्याच्या बँकेत जमा झाले होते. झूमन यादव हा मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करतो, तो सध्या सुट्टी घेऊन आपल्या घरी आलेला आहे, त्याचवेळी हा प्रकार घडला.
त्याने जेव्हा आपल्या खात्यामधील रक्कम तपासली तेव्हा त्याला धक्काच बसला, लाखो करडो रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा झाले होते. दरम्यान हे प्रकरण आता सायबर सेलकडे पोहोचलं आहे. या मजूराचं बँक खातं गोठवण्यात आलं असून, हे पैसे नेमके कुठून आले? कोणी जमा केले याचा शोध सुरू असल्याची माहिती सायबर सेलचे हिमांशु कुमार यांनी दिली आहे. याबाबत झी न्यूजकडून माहिती देण्यात आली आहे.