AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Price : अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच! कांद्याचा भाव धाडकन कमी…सामान्यांना मोठा दिलासा

आगामी काही काळात कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्र प्रदेशमधून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या राज्यातून खरीप हंगामातील कांदा लवकरच बाजरात येण्याची शक्यता आहे.

Onion Price : अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच! कांद्याचा भाव धाडकन कमी...सामान्यांना मोठा दिलासा
Onion Price In IndiaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 3:59 PM
Share

Onion Price In India : अल निनोमुळे शेती संकटात आलीय. त्याचा परिणाम काहीसा घाऊक आणि किरकोळ बाजारावर पडतोय. सध्या बाजारात कांद्याचा भाव चांगलाच वाढलाय. गेल्या वर्षाच्या तुलनेत कांद्याचा भाव थेट दुप्पट झालाय. या महागाईमुळे सामान्यांचं कंबरडं मोडतं की काय अशी स्थिती आहे. दरम्यान, आता सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आगामी काळात कांद्याचा भाव कमी होऊ शकतो. विशेष म्हणजे जगभरातील कांद्याचा भाव कमी होण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

सध्या कांद्याचा भाव किती?

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार आगामी काळात कांद्याचा भाव कमी होण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबर रोजी देशात कांद्याचा किरकोळ बजारातील भाव 52.99 रुपये प्रती किलो आहे. गेल्या वर्षी याच काळात हा भाव 26.65 रुपये प्रती किलो होता. म्हणजेच एका वर्षाच्या तुलनेत कांद्याचा भाव साधारण 99 टक्क्यांनी वाढलाय. सरकारी आकड्यानुसार 10 सप्टेंबर रोजी कांद्याचा सरासरी किरकोळ भाव 53.10 रुपये होता. हाच भाव 10 ऑक्टोबर रोजी 52.99 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला. म्हणजेच घाऊक बाजारात कांद्यााच भाव कमी होणार असल्याचे बोलले जात असले तरी किरकोळ बाजारात मात्र कांद्याचा भाव अद्याप कमी झालेला पाहायला मिळत नाहीये.

घाऊक बाजारात कांद्याचा सरासरी भाव 4,591 रुपये प्रति क्विंटल आहे. गेल्या महिन्यात हा भाव 2.4 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षभराच्या तुलनेत हा भाव तब्बल 123.3 टक्क्यांनी जास्त आहे.

कांद्याचा भाव कमी कसा होणार? सरकारने नेमकं काय केल?

दरम्यान, आगामी काही काळात कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्र प्रदेशमधून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या राज्यातून खरीप हंगामातील कांदा लवकरच बाजरात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सरकारनेही कांद्याचा भाव कमी व्हावा यासाठी पाऊल उचलण्यास सुरुवात केलीय. सरकारने आपल्या बफर स्टॉककमधून कांद्याची विक्री करण्यास सुरुवात केलीय. हा कांदा बाजारत आल्यास भाव कमी होऊ शकतो. आवक वाढल्याने बाजारावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार