
22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला होता. द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली होती. पण वातावरण तापताच या संघटनेने घुमजाव केले. त्यानंतर आज ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय लष्करासह सरकारी यंत्रणेने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पाकिस्तानने ही संघटना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट केला. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतावाद्यांचा हात आहे हे उघड झाले आहे. या दहशतवादी संघटना पाकिस्तान पोसत आहे. पण आता भारतीय लष्कराने संयुक्त राष्ट्र संघातील पाकिस्तानी सरकारच्या या संघटनांना वाचवण्याचा प्रयत्न उघड केला आहे.
पहलगाम हल्ल्यामागे TRF हा गटच
भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर आणि अमानवीय होता असे म्हटले आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या कुटुंबियासमोरच त्यांना गोळ्या घातल्या. त्यांनी हा हल्ला द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी गटाने केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या संघटनेने आपले फेसबूक, ट्विटर हॅक करून कोणीतरी आपल्यावर हा हल्ला लादल्याचा केलेला आरोप खोटा ठरला आहे. या संघटनेचा कांगावा उघडा पडला आहे. पाकिस्तान जगाला सतत चुकीची माहिती देत आहे. पाकिस्तानच दहशतवाद्यांची भूमी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्राला अगोदरच भारती सूचना
एका समूहाने टीआरएफ म्हणून जबाबदारी घेतली आहे. ही संघटना तोयबाशी संबंधित आहे. भारताने संयुक्त राष्ट्रात अर्धवार्षिक रिपोर्ट दिला होता. त्यात टीआरएफची माहिती दिली होती. पाकिस्तानच्या अतिरेक्यांसाठी कव्हर ग्रुप म्हणून टीआरएफ काम करत होता. टीआरएफ सारख्या छोट्या दहशतवादी संघटनांमार्फत तैयबा काम करत होते, असे या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास केला. त्यात पाकिस्तानचे दहशतवाद्यांसोबतचे संबंध उघड झाले. सोशल मीडियाद्वारे हल्ल्याचं रिपोस्ट करणं यातून हे सबंध उघड होतात. अतिरेक्यांची ओळखही पटली आहे. आमच्या टीमने मास्टरमाइंडची माहिती मिळवली आहे. सीमेपलिकडून हल्ला करण्याच्या पाकिस्तानच्या रेकॉर्डचा एक भाग म्हणून हा हल्ला असल्याचं स्पष्ट झालं आहे, असे मिस्त्री म्हणाले. तर या संघटनेवरील आरोप दूर करण्यासाठी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात मोठी कसरत केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.