Operation Sindoor : छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ऑपरेशन सिंदूरवर काय प्रतिक्रिया? सुनील आंबेकरांच्या त्या ट्विटची चर्चा
RSS On Operation Sindoor : भारताने आज पाकिस्तान सरकार, लष्कर आणि दहशतवाद्यांना थेट मॅसेज दिला. वाकड्या नजरेने पाहाल तर डोळे फोडणार अशा संदेशाने पाकिस्तान थरथरला आहे. भारत हल्ला करणार ही पाकिस्तानची भीती पंतप्रधानांनी आज खरी केली. त्यावर RSS ने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भारताने पाकिस्तानसह लष्कर आणि दहशतवाद्यांना थेट मॅसेज दिला. भारत बदलल्याची चुणूक दाखवली. पहलगाम हल्ल्यात निरपराध 26 नागरिकांची हत्या करण्यात आली होती. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी, त्यांच्या समर्थकांनी विचार केला नसेल असा धडा शिकवणार असल्याचा इशारा दिला होता. 7 मे रोजी मध्यरात्री भारताने मिसाईल स्ट्राईक केला. ‘छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं’ असा सज्जड दमच भारताने पाकड्यांना दिला आहे. त्यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा धाकड प्रतिक्रिया दिली आहे.
ऑपरेशन सिंदूरची जगात चर्चा
ऑपरेशन सिंदूरचा पाया National Technology Research Organization-NTRO याने ठेवला. पाकिस्तान आणि पीओकेमधील लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्या ठिकाणाची ओळख पटवण्यात आली. पाकिस्तानमध्ये आत घुसून हल्ला करण्यात आला. पीओकेसह लाहोर जवळील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानसह दहशतवाद्यांची पाचर धारेवर बसली.
दहशतवादी ठिकाणावरच भारतीय हवाई दलाने हल्ला केला. मौलाना मसूदच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या ठिकाणी अनेक दहशतवादी आणि त्यांचे आका होते. ते या हल्ल्यात ठार झाल्याचे समोर येत आहे. पाकिस्तान आणि पीओकेमधील अनेक रुग्णालयात सध्या गर्दी आहे. या ठिकाणी दहशतवाद्यांचे मृतदेह आणण्यात आले आहे. जखमींवर उपचार करण्यात येत आहे. इतकेच नाही तर या हल्ल्यात कोणते दहशतवादी ठार झाले याची खातरजमा करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात धावले. पाकिस्तानमध्ये या मिसाईल स्ट्राईकने धडकी भरली आहे. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय बैठकांना ऊत आला आहे. भारत पुन्हा एकदा हल्ला होण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया काय?
राष्ट्रीय स्वयंयसेवक संघाने ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ट्विट करून पहिली प्रतिक्रिया दिली. “पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या न्यायाला सुरुवात -“Operation Sindoor”Justice served . Nation supports. Jai Hind. भारत माता की जय।”
पहलगाम के पीड़ितों के लिए न्याय का प्रारंभ -“Operation Sindoor”Justice served . Nation supports. Jai Hind. भारत माता की जय । pic.twitter.com/vNqNuVVYW5
— Sunil Ambekar (@SunilAmbekarM) May 7, 2025
अशी प्रतिक्रिया आंबेकर यांनी दिली. त्यांनी पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय दिल्याचे सांगितले. पण त्यात न्यायाला सुरुवात असे म्हटल्याने भविष्यात भारत पुन्हा हल्ला झाला तर दहशतवाद्यांना सोडणार नाही असा अर्थ ध्वनीत होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. आंबेकर यांनी देशाचा या हल्ल्याला पाठिंबा असल्याचे सांगत भारत माता की जय, जयहिंद असे अभिवादन त्यांनी केले.
