India Air Defence System : पाकिस्तानी मिसाइल्स हवेतच उडवणारी भारताची 4 लेअर सिस्टिम काय आहे? डिटेलमध्ये समजून घ्या

India Air Defence System : ड्रोन-मिसाइल ते एअरक्राफ्टपर्यंत भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमची 4 लेअरमध्ये विभागणी झाली आहे. या 4 लेयर डिफेंस सिस्टिमने कमाल केली. पूर्ण तयारी करुन आलेल्या शत्रूला पाणी पाजलं. ही सिस्टिम आधुनिक टेक्निक, रणनीतिक आणि रियल-टाइम कॉर्डिनेशन वर आधारित आहे. जाणून या सगळ्या सिस्टिमबद्दल.

India Air Defence System : पाकिस्तानी मिसाइल्स हवेतच उडवणारी भारताची 4 लेअर सिस्टिम काय आहे? डिटेलमध्ये समजून घ्या
India Air Defence System
| Updated on: May 14, 2025 | 1:17 PM

ऑपरेशन सिंदूरमुळे भारताने आपल्या अत्याधुनिक मल्टी-लेयर्ड काऊंटर ड्रोन आणि एअर डिफेंस ग्रिडची यशस्वी चाचणी केली. या ग्रिडने शत्रूने डागलेली मिसाइल्स, ड्रोन्स आणि एअरक्राफ्टना नुसतं ट्रॅकच केलं नाही, तर वेळीच नष्ट सुद्धा केलं. भारताच्या या चार लेअरच्या एअर डिफेन्स सिस्टिमने कमाल केली. पूर्ण तयारी करुन आलेल्या शत्रूला पाणी पाजलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची हवाई सुरक्षा प्रणाली मल्टी लेअर एयर डिफेंस ग्रिडने जबरदस्त प्रदर्शन केलं. ही सिस्टिम अत्याधुनिक टेक्नोलॉजी आणि रिअल-टाइम कॉर्डिनेशनवर आधारीत आहे. देशाच्या सर्व सीमांच कुठल्याही हवाई धोक्यापासून रक्षण करण्यासाठी सज्ज आहे. भारताची ही एअर डिफेन्स सिस्टिम बारकाईने समजून घेऊया.

भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीची चार लेअरमध्ये विभागणी करण्यात आली आहे. कुठलही ड्रोन, मिसाइल आणि शत्रुच्या फायटर जेटपासून या प्रणालीमुळे बचाव होतो. हे अभेद्य सुरक्षा कवच भेदण सहजासहजी शक्य नाहीय.

पहली लेअर काऊंटर ड्रोन आणि MANPADS : सीमावर्ती भागात 200 किलोमीटरच्या आत अँटी ड्रोन सिस्टिम आणि MANPADS सारखी IGLA, LLAD तैनात करण्यात आली आहे. ही सिस्टिम लहान आणि कमी उंचीवरून उडणाऱ्या लक्ष्यांना टार्गेट करण्यास सक्षम आहे.

दुसरी लेअर प्वाइंट एअर डिफेंस आणि SR-SAM : या लेयरमध्ये SR-SAM (शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाइल्स), उदहारणार्थ स्पायडर आणि SAMAR प्रणाली तैनात आहे. वेगात येणाऱ्या हवाई धोक्यांना या सिस्टिमद्वारे नष्ट करता येते.

तीसरी लेअर MRSAM (Barak-8) : ही सिस्टिम मध्यम अंतरावरील मिसाइल हल्ले आणि एअरक्राफ्टना रोखण्यासाठी तयार करण्यात आलीय. इस्रायलच्या सहकाऱ्याने MRSAM प्रणाली बनवण्यात आली आहे.

चौथी लेअर LRSAM (S-400) : ही लेयर रशियाकडून विकत घेण्यात आली आहे. S-400 ट्रायम्फ सिस्टम तैनात आहे. 400 किमी अंतरावर असलेला कुठलाही धोका ओळखून नष्ट करण्याची क्षमता यामध्ये आहे. या एअर डिफेन्स सिस्टिमने ऑपरेशन सिंदूर दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे पाकिस्तानच एक मिसाइल आपल्या देशात घुसू शकलं नाही.

‘आकाशतीर’ आणि ‘IACCS’ नेटवर्क : पूर्ण ग्रिडला आकाशतीर कमांड सिस्टम आणि IACCS (Integrated Air Command and Control System) जोडण्यात आलं आहे. रडार आणि मिसाइल युनिट दरम्यान वेगाने डेटा ट्रान्सफर आणि समन्यवय सुनिश्चित करतो. ही अशी सिस्टिम आहे, जिथे संपूर्ण देशात युद्धादरम्यान होणाऱ्या हवाई घडामोडींची माहिती एकाच ठिकाणी मिळते. त्यानंतर भारताची तिन्ही सैन्यदलं आणि भारतीय एअर डिफेन्स या आधारावर पुढील कारवाई करतात.

रडार आणि सर्विलांस सिस्टम : यात विभिन्न रेंजचे रडार आहेत. उदहारणार्थ LLR, MPR आणि HPR. चौवीस तास या सिस्टिमच सीमेवर लक्ष्य असतं. शत्रुची कुठलीही हालचाल वेळीच या रडार्सकडून टिपली जाते.