
Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तानमध्ये चौथ्या दिवशी तणावाचे वातावरण आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंत भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यातंर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांचा अचूक ठाव घेण्यात आला. त्यानंतर 7-8 मे दरम्यान रात्री पाकिस्तानने भारतातील 15 शहर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड आणि भूज यावर मिसाईल आणि ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिम एस-400 ने हा हल्ला परतून लावला.
S-400 Sudarshan हे नाव का दिले?
पुराणांनुसार, सुदर्शन चक्र सर्व दिव अस्त्रांमध्ये शक्तीशाली आहे. सुदर्शन चक्राला तामिळमधये चक्रत्तालवार म्हटले जाते. थायलंडमधील चक्री वंशाचे ते प्रतिक मानण्यात येते. शास्त्रातील दाखल्यानुसार, सुदर्शन चक्र हे त्रिदेवांचे गुरू, बृहस्पतीने भगवान विष्णूला दिले होते. तर काही मान्यतानुसार श्रीकृष्णाने देवतांकडून ते प्राप्त करून घेतले. महाभारतानुसार, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी खांडव वन जाळण्यात अग्निदेवाची मदत केली होती. त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांना एक कौमुदकी गदा आणि चक्र भेट दिले होते.
शास्त्रानुसार, सुदर्शन चक्र श्रीकृष्ण हे आपल्या बोटांवर धारण करून आहेत. तर भगवान विष्णू हे सुदर्शन चक्र त्यांच्या तर्जनीवर धारण करतात. अशी मान्यता आहे की शत्रूंचा संहार केल्यानंतर, त्यांना नष्ट केल्यानंतर सुदर्शन चक्र पुन्हा भगवान श्रीकृष्णाकडे परत येते. म्हणजे सुदर्शन चक्र सोडल्यानंतर पण त्याचे नियंत्रण देवाकडे आहे. सुदर्शन चक्राची गती वेगवान आहे. त्याला थांबवणे अशक्य आहे.
कसे आहे सुदर्शन चक्र?
शास्त्रानुसार, सुदर्शन चक्राची निर्मिती अद्भूत आहे. हे गोल आकाराचे चक्र आहे. त्याचे काठ तीक्ष्ण आहेत. सुदर्शन चक्रात अत्यंत टोकटार काटे आहेत. त्याच्यात दोन चक्र आहेत. ते दोन्ही विरुद्ध दिशेला एकाचवेळी एकाचगतीने फिरतात. हे चक्र इतर शस्त्राप्रमाणे फेकण्यात, डागण्यात येत नाही तर ते इच्छाशक्तीने शत्रूचे संहार करते.
का दिले एस-400 ला सुदर्शन हे नाव?
भारताने S-400 एअर डिफेन्स सिस्टिमला ‘सुदर्शन’ नाव दिलं आहे, त्यामागे एक कारण आहे. हे अत्याधुनिक शस्त्र भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रासारखं कार्य करतं. अचूक, वेगवान आणि अत्यंत परिणामकारक. सुदर्शन चक्र हे विष्णूंचं आणि नंतर श्रीकृष्णाचं दिव्य अस्त्र होतं, जे शत्रूचा संपूर्ण नाश करतं आणि पुन्हा परत येतं. त्याचप्रमाणे, S-400 देखील शत्रूच्या क्षेपणास्त्रांना नष्ट करून भारताचं आकाश सुरक्षित करतं. त्यामुळे हे नाव देण्यात आले आहे.