Operation Sindoor : अवघ्या 25 मिनिटांत दहशतवाद्यांचा खेळ खल्लास; काय काय घडलं?

Markaz Subhan Allah to Sayyidna Bilal camp destroyed : भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. PoK आणि थेट पाकिस्तानमध्ये घुसत दहशतवाद्यांना नरकात पाठवण्यात आले. अवघ्या 25 मिनिटात 21 ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. भारत अजून हल्ला करण्याच्या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.

Operation Sindoor : अवघ्या 25 मिनिटांत दहशतवाद्यांचा खेळ खल्लास; काय काय घडलं?
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान हादरला
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Edited By: | Updated on: May 07, 2025 | 2:21 PM

ऑपरेशन सिंदूरने पाकड्यांची भांबेरी उडवली. दहशतवादी जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानमध्ये सैरभैर पळत आहेत. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर 9 टार्गेटेड हल्ले केले. त्यात लष्कराने दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्धवस्त केले. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचे 6 म्होरके नरकात पाठवण्यात आले तर इतर अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. या हल्ल्याची माहिती सरकारसह लष्कराने घेतलेल्या संयुक्त परिषदेत घेतली.

पाहा लाइव्ह टीव्ही

कर्नल कुरेशी यांनी दाखवले ते फुटेज

सर्वसामान्याला इजा नाही

ऑपरेशन सिंदूरविषयी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी लष्करासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी या हल्ल्यामागे पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांचे कनेक्शन उघड केले. भारताने केवळ दहशतवादी केंद्र लक्ष्य केल्याची माहिती त्यांनी दिली. या मोहिमेत कोणताही सर्वसामान्य नागरिक जखमी झाला नाही. पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. 200 एकरवर असलेल्या मरकज सुभान अल्लाह आणि सयदना बिलाल कॅम्पसह इतर ठिकाणं उद्धवस्त करण्यात आली. मिस्त्री यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी या हल्ल्याची माहिती दिली.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी बुधवारी रात्री 1.05 ते 1.30 या दरम्यान हल्ले केल्याची माहिती दिली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. त्यात सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान झाले नाही. लष्काराने पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाईंडला टार्गेट केले. दहशतवाद्यांचे यामुळे कंबरडे मोडले आहे.

दरम्यान कर्नल सोफिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील मुंद्रिके आणि इतर दहशतवादी ठिकाणांवरील हल्ल्याचे व्हिडिओ सुद्धा दाखवले. त्यात लष्कराने या दहशतवादी ठिकाणांचा अचूक ठाव घेतल्याचे दिसून आले. जम्मू-काश्मीरमधील सामान्य परिस्थिती बिघडवण्याच्या उद्देशाने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. हा हल्ला अत्यंत क्रूर होता. देशभरात जातीय दंगल भडकवण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले.

दहशतवाद्यांचा बालेकिल्ला उद्धवस्त

1.भारतीय लष्काराने मरकज सुभान अल्लाह ते सयदना बिलाल कॅम्पपर्यंत दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणे उद्ध्वस्त केली. 25 मिनिटात 21 ठिकाणांवर हल्ला करण्यात आले. या कारवाईने पाकिस्तान हादरला आहे. तर हवाई हल्ला थांबवावे आम्ही प्रत्युत्तर देणार नाही, असे पाकिस्तान सरकारने स्पष्ट केले आहे.

2. या हल्ल्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर आणि मुरीदके हे लक्ष्य होतं. राजस्थानच्या सीमेजवळ असलेलं बहावलपूर हे मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी गटाचा बालेकिल्ला होता. त्यावर थेट मिसाईल हल्ला करण्यात आला. ते उद्धवस्त करण्यात आले.

3. तर लाहोरमधील मुरीदके हे शहर लष्कर-ए-तैयबाचं तळ उद्धवस्त झाले. पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली आणि मुझफ्फराबादमधील ठिकाणांवर मिसाईल डागण्यात आली. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यात आले. भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी अमजल कसाब आणि डेव्हिड हेडली यांनी प्रशिक्षण घेतलेले तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे.