AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sidoor : पहलगाम हल्ल्यामागे TRF हा गट; भारतीय लष्कराची ती गोटातील माहिती काय?

TRF Pakistan : द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी संघटनेने अगोदर पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. नंतर त्यांनी घुमजाव केले. पण भारतीय लष्काराने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानी सरकार या संघटनेला वाचवण्यासाठी काय प्रयत्न करत होते, ते उघड झाले आहे.

Operation Sidoor : पहलगाम हल्ल्यामागे TRF हा गट; भारतीय लष्कराची ती गोटातील माहिती काय?
टीआरएफ हीच पहलगाम हल्ल्यामागेImage Credit source: गुगल
| Updated on: May 07, 2025 | 11:18 AM
Share

22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला होता. द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली होती. पण वातावरण तापताच या संघटनेने घुमजाव केले. त्यानंतर आज ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय लष्करासह सरकारी यंत्रणेने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पाकिस्तानने ही संघटना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट केला. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतावाद्यांचा हात आहे हे उघड झाले आहे. या दहशतवादी संघटना पाकिस्तान पोसत आहे. पण आता भारतीय लष्कराने संयुक्त राष्ट्र संघातील पाकिस्तानी सरकारच्या या संघटनांना वाचवण्याचा प्रयत्न उघड केला आहे.

पहलगाम हल्ल्यामागे TRF हा गटच

भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर आणि अमानवीय होता असे म्हटले आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या कुटुंबियासमोरच त्यांना गोळ्या घातल्या. त्यांनी हा हल्ला द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी गटाने केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या संघटनेने आपले फेसबूक, ट्विटर हॅक करून कोणीतरी आपल्यावर हा हल्ला लादल्याचा केलेला आरोप खोटा ठरला आहे. या संघटनेचा कांगावा उघडा पडला आहे. पाकिस्तान जगाला सतत चुकीची माहिती देत आहे. पाकिस्तानच दहशतवाद्यांची भूमी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्राला अगोदरच भारती सूचना

एका समूहाने टीआरएफ म्हणून जबाबदारी घेतली आहे. ही संघटना तोयबाशी संबंधित आहे. भारताने संयुक्त राष्ट्रात अर्धवार्षिक रिपोर्ट दिला होता. त्यात टीआरएफची माहिती दिली होती. पाकिस्तानच्या अतिरेक्यांसाठी कव्हर ग्रुप म्हणून टीआरएफ काम करत होता. टीआरएफ सारख्या छोट्या दहशतवादी संघटनांमार्फत तैयबा काम करत होते, असे या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास केला. त्यात पाकिस्तानचे दहशतवाद्यांसोबतचे संबंध उघड झाले. सोशल मीडियाद्वारे हल्ल्याचं रिपोस्ट करणं यातून हे सबंध उघड होतात. अतिरेक्यांची ओळखही पटली आहे. आमच्या टीमने मास्टरमाइंडची माहिती मिळवली आहे. सीमेपलिकडून हल्ला करण्याच्या पाकिस्तानच्या रेकॉर्डचा एक भाग म्हणून हा हल्ला असल्याचं स्पष्ट झालं आहे, असे मिस्त्री म्हणाले. तर या संघटनेवरील आरोप दूर करण्यासाठी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात मोठी कसरत केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.