सर्वात मोठी बातमी! भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त

मोठी बातमी समोर येत आहे, ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिला आहे. भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली आहे.

सर्वात मोठी बातमी! भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2025 | 3:14 PM

मोठी बातमी समोर येत आहे, ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिला आहे. भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता भारतानं पाकिस्तानची रडार सिस्टिमच उद्ध्वस्त केली आहे.

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतानं घेतला आहे, पाकिस्तानच्या घरात घुसून एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे एकूण 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील पाच तर पाकिस्तानमधील चार दहशतवादी ठिकाणांचा समावेश आहे. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी मध्यरात्री भारतानं एअर स्ट्राईक केला, आणि त्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्यानं हादरलं आहे. आतापर्यंत तब्बल 50 ड्रोन हल्ले झाले आहेत. पाकिस्तानच्या 12 शहरांवर पन्नास ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. या ड्रोन हल्ल्याची जबाबदारी भारतानं घेतली आहे.

भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये नऊ दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त झाले, ज्यामध्ये पीओकेमधील 5 तर पाकिस्तानमधील चार दहशतवादी ठिकाणांचा समावेश होता, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने बुधवारी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आता भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतानं  पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. तसेच पाकिस्तानच्या बारा शहरांवर एकामागून एक पन्नास ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी देखील भारतानं स्विकारली आहे.

याबाबत माहिती देताना भारताच्या संरक्षण विभागानं म्हटलं आहे की, पाकिस्तानमधील अनेक हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य करून निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या उत्तर आणि पश्चिम लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेत्रणास्त्र हल्ला केला होता, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.  पाकिस्तानवर पन्नास ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.