AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिले संबोधन, म्हणाले, 2040 पर्यंत…

पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त करणारी ऑपरेशन सिंदूर ही कारवाई काल मध्यरात्री करण्यात आली. या हल्ल्याची भारतासह जगभरात चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन देशाला संबोधित केलं. काय म्हणाले नरेंद्र मोदी ?

Narendra Modi : ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिले संबोधन, म्हणाले, 2040 पर्यंत...
| Updated on: May 07, 2025 | 12:43 PM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील नृशंस दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काल मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात एअर स्ट्राईक केला. 9 दहशतवादी तळांना मिसाइल्सद्वारे टार्गेट करण्यात आले आणि ते उद्ध्वस्त  झाले, ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या एअर स्ट्राईकची सध्या भारतापासून सर्वत जगभरात चर्चा सुरू असून आज सकाळी सेनेतर्फे एक पत्रकार परिषदही घेण्यात आली. पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर आणि अमानवीय होता, असे भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटले. दरम्यान या हल्ल्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून देशातील राजकीय नेत्यांनी या भूमिकेचे कौतुक केले.

या कारवाईबद्दल खुद्द पंतप्रधान मोदी काय म्हणतात, याची सर्वांनाच उत्सुकता होती. कारण कालच्या ऑपरेशन सिंदूरनंतर दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिले संबोधन होते. जागतिक अंतराळ संशोधन परिषदेत ते बोलत होते. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबद्दल त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. 2040 पर्यंत भारतीय पाऊल चंद्रावर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एअर स्ट्राईकनंतर संपूर्ण जगाचे त्यांच्याकडे लक्ष लागलेले असतानाच पंतप्रधान मोदी हे मात्र ऑपेरशन सिंदूरबद्दल काहीच बोलले नाहीत.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

भारताने इतिहास रचला आहे. भारताने चंद्रयान 1 पाठवलं. चंद्रावर पाण्याचा शोध लावला. चंद्रयान दोन आणि चंद्रायन तीनही पाठवलं. भारताने अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे. भारताचा स्पेस प्रवास हा कुणाशी स्पर्धा नाही तर एकत्र सोबत जाण्याचा आहे. मानवतेसाठी स्पेस एक्सप्लोअर करण्याचं आमचं मिशन होतं, असं मोदी म्हणाले. आम्ही मार्स मिशन सुरूच ठेवणार आहोत. या मोहिमेतून अनेक चांगल्या गोष्टी समोर आल्या. गगनयान आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.

2040 पर्यंत भारतीय पाऊल चंद्रावर असेल

इस्रोने एका मिशनमध्ये एकाच वेळी 100 सॅटेलाईट सोडण्याची कामगिरीही केली. आमच्या सॅटेलाईटद्वारे प्रत्येक भारतीयांच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. भारताकडे 250 हून अधिक स्पेस स्टार्ट आहेत. आमच्याकडे आधुनिक सॅटेलाईट टेक्नॉलॉजी आहे. महिला शास्त्रज्ञांकडून आमच्या मिशनचं नेतृत्व केलं जात आहे, ही मोठी गोष्ट आहे असं मोदी म्हणाले.

लवकरच भारताचं स्पेस स्टेशन असेल . 2040 पर्यंत भारतीय पाऊल चंद्रावर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक भारतीयांसााठी सॅटेलाईट काम करणार, असंही मोदी म्हणाले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.